अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमातून अनुभवायला मिळणार अस्सल ‘देशी खो खो’चे नव्या रूपात दर्शन

Date:

येत्या रविवारपासून पुण्यातील बालेवाडी येथे रंगणार सामने

पुणे, १२ ऑगस्ट २०२२:
 पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे येत्या रविवारपासून अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमाचा प्रारंभ होत असून या निमित्ताने भारतीय क्रीडाप्रेमींना सर्वोत्तम दर्जाच्या खो-खोतील कौशल्यांचे दर्शन घडणार आहे. चेन्नई क्विक गन्स, गुजरात जायंट्स, मुंबई खिलाडीज, ओडिशा जुगरनट्स, राजस्थान वॉरियर्स आणि तेलुगु योद्धा हे सहा संघ या स्पर्धेतील विजेतेपदासाठी झुंज देणार असून पूर्वी कधीही न पाहिलेल्या आधुनिक खो खोच्या नव्या अवताराचे दर्शन घडविण्यासाठी या संघांतील खेळाडू सज्ज झाले आहेत.  

या स्पर्धेच्या निम्मिताने पार पडलेल्या पत्रकारपरिषदेत या सहा संघांचे कर्णधार, प्रशिक्षक आणि प्रमुख खेळाडू यांनी आपली पूर्वतयारी आणि पहिल्या मौसमातील लक्ष्य यावर प्रकाश टाकला. यावेळी लीगचे आयुक्त आणि अल्टिमेट खो खो स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेंझिंग नियोगी आणि पहिल्या मौसमातील प्रमुख सादरकरता व बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणा उपस्थित होते. या लीगमधील सर्व सामान्यांचे प्रक्षेपण अधिकृत वाहिनी असलेल्या सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.

अल्टिमेट खो खो स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेंझिंग नियोगी म्हणाले की, खो खो हा खेळ प्रत्येक भारतीयाच्या मनाशी जोडलेला असल्यामुळे हा क्षण आमच्यासाठी खास असाच आहे. अत्यंत प्राचीन असा हा खेळ देशातील प्रत्येक शाळेत खेळला जातो. अस्सल भारतीय मातीतील हा खेळ नव्या रूपात जगासमोर आणताना आम्हांला अभिमान वाटत असून आमचे सर्व खेळाडू जणू काही स्वप्नांतील उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोनी नेटवर्कच्या माध्यमातुन देशांतील असंख्य क्रीडा प्रेमी या खेळाडूंचे सर्वोत्तम कौशल्य पाहू शकणार आहेत.  

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणा म्हणाला की, आजच्या स्थितीत आणि या वयात प्रत्येकाला एक परिपूर्ण जीवन जगायचे असते. त्याच्यात मी अनेकसे चित्रपट केले कार्यक्रम केले, प्रवास केला. या लीग संदर्भात जेव्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी बोलणे झाले तेव्हा सुरुवातीला पाचच मिनिटांत या लीगविषयी आकर्षण निर्माण झाले. एक परिपूर्ण आनंद देणारी अशी हि लीग आहे. माझे जीवन हे खेळाभोवती गुरफटलेले होते. मला नायक म्हणून ज्याप्रमाणे चाहत्यांनी स्वीकारले, त्याचप्रमाणे या खेळाच्या नव्या भूमिकेतही मला स्वीकारतील असा मला विश्वास वाटतो.

तसेच कर्णधार आणि प्रमुख खेळाडू, अमित पाटील आणि महेश शिंदे (चेन्नई क्विक गन्स), रंजन शेट्टी आणि अनिकेत पोटे (गुजरात जायंट्स), विजय हजारे आणि राजेश कुमार (मुंबई खिलाडीज), दिपेश मोरे आणि मिलिंद चावरेकर (ओडिशा जुगरनट्स), मजहर जमादार आणि अक्षय गणपुले (राजस्थान वॉरियर्स), आणि प्रज्वल केएच आणि प्रतीक वाईकर (तेलुगु योद्धाज) यांच्यासह प्रशिक्षक मनोहरा सीए (चेन्नई क्विक गन्स), संजीव शर्मा (गुजरात जायंट्स), राजेंद्र साप्ते (मुंबई खिलाडीज), आश्वनी कुमार शर्मा (ओडिशा जुगरनट्स), नरेंद्र कुंदर (राजस्थान वॉरियर्स) आणि सुमित भाटिया (तेलुगु योद्धाज) या 143 खेळाडूंची निवड गेल्या महिन्यात करण्यात आली. अत्यंत व्यावसायिक अशा आस्थापानाच्या माध्यमातुन हे खेळाडू व्यावसायिक दृष्ट्या या लीगसाठी कसून तयारी करीत असून आपापल्या प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सर्वोत्तम सुविधांच्या साहाय्याने उच्च दर्जाची तंदरुस्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.

व्यावसायिक अशा फ्रॅन्चायझीनच्या पायावर उभ्या असलेल्या देशातील पहिल्यावहिल्या व्यावसायिक खो खो स्पर्धेला अमित बर्मन यांनी प्रायोजित केले असून अखिल भारतीय खो खो महासंघाचे सहकार्य लाभले आहे.

अल्टिमेट खो खोच्या पहिल्या मौसमास गुजरात जायंट्स व मुंबई खिलाडीज संघाच्या लढतीने सुरुवात होणार असून चेन्नई क्विक गन्स विरुद्ध तेलगु योद्धाज यांच्यात दुसरा सामना होणार आहे. हि स्पर्धा ४ सप्टेम्बर या कालावधीपर्यंत रंगणार आहे.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...