सातारा येथील माहेर आश्रमने क्रेनच्या निधीतून बांधलेल्या दोन नवीन इमारतींच्या उद्घाटनाची घोषणा केली.
गेल्या महिन्यात क्रेन इंडियाने भारतातील सातारा येथे त्यांच्या नवीन ११०००० चौरस फूट इंजिनीयर्ड चेक वॉल्व्हज कारखान्याचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. तसेच त्याच दिवशी सकाळी त्यांनी वंचित मुलांसाठी स्थानिक क्रेन-अनुदानित माहेर होम कॉम्प्लेक्समध्ये दोन नवीन इमारतींचे अनावरण केले. जगभरातील क्रेनच्या इतर मान्यवरांच्या उपस्थितीत क्रेन इंडियाचे अध्यक्ष हरी जिनागा यांच्या हस्ते या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी क्रेन बिल्डिंग सर्विसेसचे अध्यक्ष रिचर्ड टक, क्रेन सीपीईचे अध्यक्ष गुस्तावो क्रूझ, क्रेन मिडल इस्ट अॅण्ड आफ्रिकाचे अध्यक्ष मार्क युसेफ, ग्लोबल सेल्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष जुर्गेन सॉन्डरचेफर, माहेरच्या सीनियर लुसी कुरियन आणि इतर स्थानिक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
क्रेनने २०१९ मध्ये सातारा येथे पहिल्या प्रायोजित माहेर इमारतीचे उद्घाटन केले आणि ऑक्टोबर २०२० मध्ये दोन अतिरिक्त इमारतींचे भूमिपूजन केले. हे बांधकाम कोविडदरम्यान पूर्ण झाले. सध्या माहेर कॅम्पसमध्ये क्रेन फंड्सद्वारे दान केलेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा समावेश आहे आणि या इमारतींमध्ये जवळपास १०० मुले व मुली सामावतील, ज्यामुळे या वंचित निवासींना सुरक्षित आश्रयस्थान मिळेल.
“गेल्या ३० वर्षांत स्थानिक समुदायांमध्ये आमच्या योगदानामुळे आणि गुंतवणवूकीद्वारे क्रेन इंडिया ही देशातील एक प्रभावशाली कंपनी बनली आहे. नवीन इंजिनीयर्ड चेक व्हॉल्व्ह कारखान्याच्या उद्घाटनासोबतच आज आम्ही सातारा येथील वंचित मुलांसाठी क्रेन-अनुदानित माहेर होम कॉम्प्लेक्समध्ये आणखी एका इमारतीचे उद्घाटन करत स्थानिक स्वयंसेवी संस्था माहेरसोबतच्या आमच्या भागीदारीची पुष्टी केली आहे,’’ असे हरी जिनागा म्हणाले.
“माहेर (मराठी भाषेत) म्हणजे ‘मदर्स होम’: आशा, आपलेपणा आणि समजूतदारपणाचे आश्रयस्थान. लिंग, जात, पंथ किंवा धर्म यांचा विचार न करता संपूर्ण भारतातील निराधार महिला, मुले आणि पुरुषांना त्यांच्या उच्च दर्जाच्या जीवनाचा अधिकार वापरण्यास मदत करण्याचा आमचा मनसुबा आहे.”, असे सिस्टर लुसी कुरियन म्हणाल्या. “माहेर औदार्य आणि परोपकाराच्या या दयाळू कृतीसाठी, तसेच माहेरवर विश्वास व आत्मविश्वास दाखवण्यासाठी क्रेन व त्यांच्या स्थानिक प्रमुखांचे आभार मानते.’’
मागील दशकापासून माहेरला स्वतंत्र सेवाभावी उपक्रमांसाठी क्रेनचा अविरत पाठिंबा मिळाला आहे. हे स्वतंत्र सेवाभावी उपक्रम क्रेन सहयोगी व त्यांच्या कुटुंबांना, स्थानिक समुदायांना, शैक्षणिक संस्थांना आणि जगभरातील मदतकार्यांना साह्य करतात. अलीकडील समारोह क्रेनच्या अर्थपूर्ण संस्कृतीची पुष्टी देतो, जे आज ते विस्तारित करू शकलेल्या व्यापक पाठिंब्यासाठी पाया रचलेले रिचर्ड टेलर क्रेन यांच्या सेवाभावी स्वरूपानुसार आहे.
माहेर बाबत
माहेरने १९९७ मध्ये विनम्र सुरूवात करण्यापासून लांबचा पल्ला गाठला आहे. आज माहेर यूएन नोंदणीकृत एनजीओ – नॉन-गव्हन्रमेंटल ऑर्गनायझेशन आहे. ४००० हून अधिक महिला व मुलांना माहेरमध्ये आश्रय मिळाला आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व सन्मान निर्माण झाला आहे. आघात किंवा इतर जटिलतांमुळे आपल्या कुटुंबांसोबत राहू न शकणाऱ्या लोकांची काळजी माहेर घेते आणि अनेकजण हाऊसमदर्स किंवा सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी येथे राहतात. माहेरमधील सर्वांना त्यांची जात किंवा धर्म विचारात न घेता उच्च दर्जाचा आहार, वैद्यकीय लक्ष आणि मानसोपचार सल्ला मिळतो. सर्व मानवांना व सर्व धार्मिक विश्वासांना समान वागणूक दिली जाते आणि सर्व प्रमुख सण समान उत्साहाने साजरे केले जातात. माहेर पुण्याच्या आसपासच्या ८५ हून अधिक ग्रामीण समुदायांमध्ये, तसेच रत्नागिरी, केरळ आणि झारखंड येथे आहे.

