कामशेत येथील गगन न्यूलाईफ रिसॉर्ट रेसिडेन्सी ठरतंय, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे नंदनवन.

Date:

भारतात गगन न्यूलाईफ रिसॉर्ट रेसिडेन्सीसारखा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आलीशान गृहप्रकल्प (लक्झरी सीनियर लिव्हिंग होम्स) वडीलधाऱ्यांसाठी समकालीनता व मौजेचा संगम ठरणाऱ्या जीवनशैलीची अचूक व्याख्या करतो. सध्याच्या करोना साथीच्या काळात तर हा गृहप्रकल्प येथे राहणाऱ्या वडीलधाऱ्यांसाठी खरोखर नंदनवन ठरला आहे.  

यासंदर्भात ‘गगन न्यूलाईफ’चे संचालक अल्नेश सोमजी niम्हणाले, “सध्याच्या अनिश्चित काळात करोना विषाणूच्या साथीमुळे ज्येष्ठ नागरिकांना सर्वांधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना घरी कुणाच्याही मदतीशिवाय जीवनाशी तडजोड करावी लागते, दैनंदिन गरजांसाठीही बाहेर वावरण्यावर निर्बंध लादले जातात, तत्काळ आरोग्यसुरक्षा किंवा सोबत मिळत नाही. न्यूलाईफ गृहप्रकल्पातील उत्साही ज्येष्ठ समुदायाने मात्र या सगळ्या समस्यांवर फुली मारली असून लॉकडाऊनच्या काळातही जीवनाचा नेहमीप्रमाणे आनंद घेतला आहे.” ते पुढे म्हणाले, “नुकताच येथे नवरात्र उत्सव आनंद व उत्साहात साजरा झाला. ज्येष्ठ नागरिकांनी गरबा नृत्यांमध्ये सहभाग घेतला आणि चविष्ट पाककृतींचा आनंदही लुटला. त्यांच्यातील चैतन्य वाखाणण्याजोगे होते.”

पुण्याजवळ कामशेत येथील गगन न्यूलाईफ प्रकल्पातील घरे लक्झरी रिटायरमेंट होम्स प्रकारची असून तेथे जीवनाचा भरभरुन आनंद घेण्याची अनेक कारणे आहेत. हा प्रकल्प निसर्गरम्य हिरवाईत चौदा एकरांहून अधिक जागेत विस्तारला असून आजूबाजूला डोंगररांगा, वर्षभर आरोग्यदायी हवामान, प्रदूषणमुक्त पर्यावरण यांचे सानिध्य आहे. हा प्रकल्प आयुष्याच्या सोनेरी वर्षांना आनंदाने भरुन टाकतो. येथील मौजेने भरलेल्या वातावरणामुळे रहिवासी स्वाभिमान, पर्याय व स्वातंत्र्य यांसह जीवनाचा आनंद उपभोगतात. या प्रकल्पात १ बीएचके व २ बीएचके होम्स अथवा व्हिलाज असून त्यांची रचना ज्येष्ठांसाठी मैत्रीपूर्ण व सहाय्यक तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे.

न्यूलाईफ ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची सेल्फ-कन्टेन्ड मिनी टाऊनशिप आहे, जेथे प्रत्येक इमारतीत दैनंदिन घर देखभाल, साप्ताहिक लाँड्री सेवा, गृहांतर्गत परिचारिका, मल्टीक्युझिन रेस्टॉरंट, ॲक्टिव्हिटीज अँड एन्टरटेन्मेंट सेंटर्स, शटल सर्व्हिसेस, द्वारपाल सेवा, आऊटडोअर रिक्रिएशनल एरिया, परिसरात सुसज्ज रुग्णालय अशा अनेक सेवा व सुविधा सज्ज आहेत. या पुरस्कारप्राप्त परिसराची रचना ज्येष्ठांच्या गरजांनुसार करण्यात आली असून तेथे सध्या ३७५ आनंदी कुटूंबाची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. समविचारी समुदायामध्ये राहून वृद्धापकाळ मानाने व रुबाबात घालवण्याची संकल्पना हा गृहप्रकल्प प्रवर्तित करतो. येथे घर घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व इच्छुकांना तेथे राहून अनुभूती घेण्याची संधीही प्रवर्तक देत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...