पुण्याच्या प्रसिद्ध डॉक्टर व गायिका डॉ. शिल्पा दाणे यांना ‘मिसेस महाराष्ट्र ब्युटिफूल स्किन 2019’ ताज

Date:

पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर व गायिका डॉ. शिल्पा दाणे यांना मिसेस महाराष्ट्र एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र ब्युटिफूल स्किन 2019 या सन्‍मानने नुकताच गौरव करण्यात आला. पुण्यातील हयात पुणे हॉटेलमध्ये रंगलेल्या दिवा पेजंट्स कार्यक्रमात हा सन्‍मान त्यांना देण्यात आला. यंदा या दिवा पेजंट्सचे चौथे वर्ष असून अंजना आणि कार्ल मास्करहॅन्स यांच्या कल्पनेतून हा पुरस्कारसोहळा साकारला आहे. माझ्या सुंदर त्वचेमागे माझ्या हृदयात असलेले प्रेम, माझ्या मुलगा देव आणि अर्थातच माझ्या गुणसूत्रांमधील गुण कारणीभूत आहेत”, असे शिल्पा अभिमानाने सांगतात. 400 महिलांमध्ये अंतिम फेरीसाठी एकूण ५० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.

 

डॉ. शिल्पा दाणे यांनी एम.बी.बी.एस, एम.डी. आणि फॅमिली मेडिसिन या विषयात डीएनबी या पदव्या घेतल्या असून त्या डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतानाच एक यशस्वी गायिका म्हणूनही ओळखल्या जातात. वास्तविक, ‘ऐका दाजिबा’ रिमिक्ससारखी टी-सिरीजची काही गाणी आणि व्हिडिओही त्यांच्या नावावर आहेत.

 

”दिवा पेजंट्सबद्दल मला माझ्या काकूने सांगितले आणि यात सहभागी होण्यासाठी मला त्यातूनच प्रेरणा मिळाली. मी नावनोंदणी केली. माझ्यासाठी हा खूपच नवीन अनुभव होता. माझ्या वैद्यकीय क्षेत्रापेक्षा खूपच वेगळा होता. अंतिम फेरीच्या आधीचे चार दिवस अंजना मॅडम, कार्ल सर आणि अन्य ४९ स्पर्धकांच्या सहवासात घालवले आणि आयुष्यभरासाठीचा अनुभव यातून मी घेऊ शकले. आपापल्या मुलांना लांब ठेवून एक ध्येय डोळ्यापुढे ठेवून पुण्यातील हयात हॉटेलमध्ये राहणाऱ्या इतर महिला आणि इतर मातांना भेटून खूप काही शिकायला मिळाले. या महिलांमध्ये आत्मविश्वास होता, सौंदर्य होते. त्या खंबीर होत्या आणि जे काही करत आहेत, त्याबद्दल आनंदी होत्या”, असे शिल्पा म्हणाल्या.

 

प्रख्‍यात ज्‍युरींमध्‍ये लोकप्रिय स्‍टार्स व व्‍यक्तिमत्त्‍वांचा समावेश होता जसे: वर्षा उसगावकर (अभिनेत्री), झोया अफ्रोज (अभिनेत्री), डॉ. विरल देसाई (हेअर ट्रान्‍सप्‍लाण्‍ट मॅस्‍ट्रो), डॉ. सुहानी मेंडोन्‍सा (संचालक, यलो स्‍पाइडर इव्‍हेण्‍ट्स), रचना गुप्‍ता (इंटरनॅशनल दिवा क्‍वीन), कमल शर्मा (डीओएसएम, हयात पुणे) आणि कार्ल मस्करेन्हास (संचालक, दिवा). आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रशंसित स्‍टार अभिनेता गुलशन ग्रोव्‍हरने या शोमध्‍ये उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

सर्व महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जायला हवे, मुले असतील, लग्न झाले असेल, तरी स्वतःवर लक्ष केंद्रित करावे, असा संदेश शिल्पा यांनी महिलांना दिला. शिल्पा या समाजसेविकाही आहेत. त्या व्यक्तीगत व संस्थात्मक पातळीवर समाजासाठी काही ना काही करत असतात.

 

आता हा पुरस्कार जिंकल्यानंतर, टी-सिरीजची एक यशस्वी गायिका म्हणूनही, एक डॉक्टर असल्यापासून ते मिसेस महाराष्ट्र पुरस्कार जिंकण्यापर्यंतचा आपला प्रवास डॉ. शिल्पा अन्य महिलांपर्यंत पोहोचवणार आहेत. २०२० मध्ये त्यांचा नवा सांगीतिक अल्बम प्रकाशित होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...