पुणे-गृहिणी, उद्योजिका व समाजसेविका देवयानी हजारे यांचा ८ डिसेंबर २०१९ रोजी हयात पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिवा पेजेंट्स समारोहामध्ये ”मिसेस महाराष्ट्र – इम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०१९”सह सन्मान करण्यात आला. देवयानी यांनी ५० सुंदर व प्रतिभावान फायनालिस्ट्दरम्यान गोल्ड कॅटेगरीमध्ये हा किताब पटकावला. त्यांनी ‘मिसेस महाराष्ट्र ब्युटी विथ ए परपज‘ किताब देखील पटकावला.
खामगावमध्ये राहणा-या देवयानी २००५ मध्ये विवाहानंतर पती व दोन मुलांचा सांभाळ करत आहेत. गेल्या ५ वर्षांमध्ये त्या उद्योजिका म्हणून त्यांच्या तीन कंपन्यांचे व्यवस्थापन पाहत आहेत. देवयानी हसत म्हणाल्या, ”मी नेहमीच ग्लॅमर व फॅशन इंडस्ट्रीकडे आकर्षून जायची. पण मी मानुषी छिल्लरला मिस वर्ल्डचा किताब पटकावताना पाहून प्रेरित झाले. मला सांगावेसे वाटते की, तेथूनच रॅम्पवर चालण्याचा माझा प्रवास सुरू झाला.” त्यांनी एका स्पर्धेमध्ये त्यांच्या पतीसोबत सहभाग घेण्याच्या स्वप्नाबाबत देखील सांगितले. त्यांच्या पतीने त्यांना नेहमीच त्यांची आवड पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
त्या म्हणाल्या, ”मी घरीच स्वत:चे ग्रूमिंग सुरू केले. तसेच मी खास कोर्सेस सुरू केले, जेथे मला ज्ञान मिळाले आणि माझ्या कौशल्यांमध्ये अधिक भर झाली. मी व्हिडिओज पाहिले, तज्ञांसोबत चर्चा केली, पुस्तके वाचली, मुलाखती दिल्या आणि माझा व्यक्तिमत्त्व विकासाप्रती प्रवास सुरू झाला. माझ्या ध्येयांप्रती निर्धार व कटिबद्धतेसोबत शिस्तबद्ध वेळापत्रक, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि डायटिंग इत्यादींमुळे मी फक्त सात महिन्यांमध्ये माझे वजन ७५ किलोवरून ५५ किलोपर्यंत कमी करण्यामध्ये यशस्वी ठरली.”
आणि त्यानंतर त्यांनी संचालक कार्ल व अंजना मस्करेन्हास यांचा अभिनव विचार असलेल्या दिवा पेजेंट्स साठी नोंदणी केली आणि उर्वरित यश तुमच्यासमोर आहे. त्या म्हणाल्या, ”मी त्यांचे जितके आभार मानेन ते कमीच आहे. त्यांनी आम्हा स्पर्धकांना सुरेखरित्या दिवांमध्ये बदलले आहे.”
प्रख्यात ज्युरींमध्ये लोकप्रिय स्टार्स व व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता जसे: वर्षा उसगावकर (अभिनेत्री), झोया अफ्रोज (अभिनेत्री), डॉ. विरल देसाई (हेअर ट्रान्सप्लाण्ट मॅस्ट्रो), डॉ. सुहानी मेंडोन्सा (संचालक, यलो स्पाइडर इव्हेण्ट्स), रचना गुप्ता (इंटरनॅशनल दिवा क्वीन), कमल शर्मा (डीओएसएम, हयात पुणे) आणि कार्ल मस्करेन्हास (संचालक, दिवा). आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित स्टार अभिनेता गुलशन ग्रोव्हरने या शोमध्ये उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
त्या भविष्यात आंतरराष्ट्रीय पीजण्टमध्ये सहभाग घेण्यासाठी आणि काही मॉडेलिंग व चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर्स मिळण्यासाठी योजना आखत आहेत.
फक्त एवढेच नाही, देवयानी या सहृदयी महिला असून विविध दान शिबिरांमध्ये पुस्तके व अन्न दान करत गरजूंमध्ये त्या आनंद पसरवतात. तसेच त्या अंधांसाठी असलेली चेतन सेवांकुर संस्थेला देखील पाठबळ देतात. त्यांचा हा समाजाचे ऋण फेडण्याचा एक मार्ग आहे.