पुण्यधाम आश्रमात होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रवेशिका

Date:

सोहळा येत्या ८ डिसेंबर २०१९ रोजी होणार

 पुणे – गरीबीची पार्श्वभूमी असलेल्या १५ उपवर दाम्पत्यांसाठी पुण्यधाम आश्रमातर्फे सामूहिक विविह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उदात्त उपक्रमात सहभागी होऊन लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रवेशिकांची नोंदणी खुली झाली आहे. पुण्यधाम आश्रम या स्वरुपाचा भव्य विवाह सोहळा दरवर्षी आयोजित करत असून यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.

यासंदर्भात आश्रमाच्या अध्यक्ष माँ कृष्णा कश्यप म्हणाल्या, हुंड्याची देवाण-घेवाण करण्याची प्रथा जनमानसाच्या मनातून काढून बदल घडवण्यासाठी आम्ही समाजाला आमच्यापरीने लहानसे योगदान देत आहोत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटूंबे, दृष्टीवंचित व दिव्यांग व्यक्ती, अनाथ मुली अशा वर्गांतील ५८ उपवर दाम्पत्यांनी गेल्या चार वर्षांत या सोहळ्यात विवाहाची शपथ घेतली आहे.

यंदाचा हा विवाह सोहळा पारंपरिक हिंदू पद्धतीने संपन्न होणार असून त्यात वधू-वर परस्परांना हार घालून पुरोहित व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतील. प्रत्येक नवदाम्पत्याला विवाहाचा पोशाख, वधूला रोजच्या वापरासाठी साड्या, स्टीलची भांडी. धान्य साठवण्याचे स्टीलचे डबे, ताटे, ग्लास, कटलरी आदी गरजेच्या संसारोपयोगी वस्तू, पलंगपोस, ब्लँकेट्स अशा वस्तू भेट दिल्या जातील जेणेकरुन त्यांना आनंदी वैवाहिक आयुष्याचा प्रवास सुरू करता येईल. पुण्यधामतर्फे त्यांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा मोफत सज्ज ठेवल्या जातील.”

हा कार्यक्रम येत्या ८ डिसेंबर २०१९ रोजी (रविवार) दुपारी १२ वाजून २० मिनिटे या मुहूर्तावर कृष्ण अवतार सांस्कृतिक भवनमध्ये होणार असून त्याला आश्रमाच्या माँ कृष्णा कश्यप, प्रेसिडेंट सदानंद शेट्टी व विश्वस्त मंडळ उपस्थित राहील. याखेरीज बाबासाहेब पुरंदरे, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, मुकूल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, पुण्याचे माजी महापौर प्रशांतदादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन विठ्ठल तुपे हेही आमंत्रित उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्याची अपेक्षा आहे. एकूण ४००० हून अधिक आमंत्रित या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.

पुण्यधाम आश्रम हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचे घर असून तो विश्व जागृती मिशन ट्रस्टचा प्रकल्प आहे. हा आश्रम हमारी बेटी हा प्रकल्प राबवतो ज्याअंतर्गत अनेक समाज कल्याण कार्यक्रम संपन्न होतात. गरजू विद्यार्थिनींचा शिक्षण खर्च करणे, येरवडा तुरुंगात वैद्यकीय शिबीरे भरवणे, महिला व तरुणींचा कौशल्य विकास घडवणे व सामूहिक विवाह सोहळा हे त्यापैकीच काही आहेत.

या विवाह सोहळ्यासाठी नोंदणी खुली असून इच्छुकांनी त्वरित नाव नोंदणी करावी.

दिनांक – ८ डिसेंबर २०१९

स्थळ – पुण्यधाम आश्रम, सोमजी बस स्टॉपसमोर, डी-मार्ट लेन, कोंढवा-कात्रज रस्ता, पिसोळी, पुणे – ४११०६०

ई-मेल : punyadhamashram.pune@gmail.com

संपर्क – ९०२१९३७९५३, ९८५०२४६८००, ८३२९५८४२४५

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...