अरोमाथेरपी (सुगंधोपचार) क्षेत्रातील प्रवर्तक असलेल्या ‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’ने आपली खास अरोमाथेरपी हेअर केअर श्रेणी पुण्यात प्रथमच सादर केली आहे. ‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’साठी सौंदर्य हे समग्र असून ते आंतरिक व बाह्य अशा दोन्ही सौंदर्यांवर अवलंबून असते. त्याचीच पूर्तता करण्यासाठी या ब्रँडने अशी खास केश निगा श्रेणी (हेअर केअर रेंज) सादर केली आहे, जी व्यक्तीला सौंदर्य, तसेच भावनात्मक, मानसिक, शारीरिक व सौंदर्यात्मक आत्मविश्वासाची अनुभूती मिळण्यास मदत करेल. ही श्रेणी पॅराबेन्स, पेट्रोकेमिकल्स, थॅलेट्स, सल्फेट्स, विषारी घटक, कृत्रिम रंग व गंध यापासून संपूर्णपणे मुक्त आहे.
या हेअर केअर रेंजमध्ये क्रीम कंडिशनर, डँड्रफ कंट्रोल शाम्पू, हेअर ऑइल, हेअर सेरम, हेअर फॉल कंट्रोल शाम्पू, लीव्ह-इन स्प्रे कंडिशनर, मॉइश्चर बूस्ट शाम्पू, ऑइल बॅलन्सिंग शाम्पू, ऑयली स्काल्प बॅलन्सिंग टोनर अँड शाईन व व्हॉल्युम शाम्पू या उत्पादनांचा समावेश आहे. याखेरीज अरोमाथेरपी हेअर केअर रेंजमध्ये ॲक्टिव्हेटेड बांबू चारकोल शाम्पू अँड कंडिशनर, स्टिम्युलेट ऑइल (मिश्र तेल – केसांच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट), फ्लॅकी ऑइल (कोंड्यावर उपचारासाठीचे मिश्र तेल), हेअर रिव्हायटलाइज सेरम (केसांच्या वाढीस साह्यकारी) या तेलांचाही समावेश आहे. ही श्रेणी एसजीएस मॉलमधील ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक किऑस्क, आघाडीची ब्युटी कॉस्मेटिक स्टोअर्स व अरोमामॅजिक.कॉम (Aromamagic.com) संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यासंदर्भात माहिती देताना डॉ. ब्लॉझम कोच्चर म्हणाल्या, “अरोमाथेरपी हेअरकेअर रेंजमधील आवश्यक तेलांच्या उत्तम गुणधर्मामुळे केसांच्या समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर समग्र दृष्टीकोनातून उपचार करण्यास मदत मिळते. या श्रेणीतील शाम्पू केसातील कोंड्यावर उपचारासाठी, केसगळती रोखण्यासाठी, केसांना चमक आणण्यासाठी, केसांचा पोत सुधारण्यासाठी, केसांचे पोषण राखण्यासाठी, मस्तिष्क तेलकट राहणे रोखण्यासाठी किंवा केस खूपच तेलकट बनणे रोखण्यासाठी साह्य करतात, तर टोनरमुळे मस्तिष्कावरील तेलाचे संतुलन साधले जाते. केस निगा राखण्यासाठी नैसर्गिक पर्याय मिळण्याच्या ग्राहकांच्या मागणीतून मला भारताची पहिली अरोमाथेरपी आधारित हेअर केअर सोल्यूशन्स निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
डॉ. ब्लॉझम कोच्चर या दूरदर्शी व्यक्तीमत्त्व आहेत. भारतात अरोमाथेरपी उपचारांच्या त्या प्रवर्तक असून त्यांच्या कार्यासाठी जगभर मान्यता मिळवलेल्या आहेत. त्या ब्लॉझम कोच्चर ग्रुप ऑफ कंपनीजच्या अध्यक्ष असून त्यांचे नाव ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक व ब्लॉझम कोच्चर कॉलेज ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स अँड डिझाईन (बीकेसीसीएडी) या यशस्वी ब्रँडशी जोडले गेले आहे.
‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’विषयी
‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’ हा भारतातील सर्वांत मोठा अरोमाथेरपी ब्रँड आहे. त्याची १७० हून अधिक अरोमाथेरपी-आधारित उत्पादने असून त्यात स्किन केअर, हेअर केअर, इसेन्शियल ऑइल्स व क्युरेटिव्ह ऑइल्सचा समावेश आहे. या जोरावर ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकने सौंदर्यप्रसाधने उद्योगात विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. या विशाल श्रेणीत सुगंधोपचारनिष्ठ अशी स्किन, हेअर व वेलनेस उत्पादने आहेत, जी काळजीपूर्वक संशोधनानंतर विकसित केली असून मन, शरीर व आत्म्यावर सकारात्मक कल्याणकारी परिणाम होण्यासाठी त्यांचे मिश्रण करण्यात आले आहे.
प्रत्येक उत्पादन तयार करताना पारंपरिक पद्धती वापरण्यात आल्या असून त्यात अरोमाथेरपी शास्त्राचा समन्वयही साधला आहे, ज्यात वनस्पती, फुले व बियांपासून तेल काढले जाते. सर्व आवश्यक तेले काळजीपूर्वक मागवली जातात आणि डॉ. ब्लॉझम कोच्चर यांच्या नजरेखाली त्यांचे अचूक मिश्रण केले जाते.
डॉ. ब्लॉझम व त्यांचे पती कर्नल व्ही. कोच्चर (दिवंगत) यांनी एकत्रित ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकची स्थापना वर्ष १९९३ मध्ये केली. आज त्यांची कन्या समंथा कोच्चर यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी दमदार विस्तारली असून भारतातील अरोमाथेरपी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी बनली आहे.