पुणे : केनेथ पॉल सिल्वेने आपला पदार्पणातील पहिलाच ‘बेइंतेहा प्यार’ हा हिंदी ख्रिश्चन आल्बम येथील जीझस इज लॉर्ड मिनिस्ट्रीजमध्ये नुकताच सादर केला. केनेथ हा केवळ २३ वर्षे वयाचा असून तो वर्शिप लीडर, पास्टर व वक्ता म्हणून काम करतो. देवाच्या राज्यासाठी महान गोष्टी करण्यासाठी समर्पित असलेला केनेथ मिनिस्ट्रीचा मोठा पाठीराखा आहे. ‘बेइंतेहा प्यार’ हा अत्यंत कल्पक, चैतन्यपूर्ण आणि स्वर्गीय गाण्यांचा संग्रह असून त्यात देवाच्या निरपेक्ष प्रेमाचे वर्णन आणि तो अनुभव श्रोत्यांना घ्यायला लावण्याची ताकद आहे. स्तुती आणि भक्तीचे मनोहारी मिश्रण या गाण्यांत असून सर्व वयोगटांना आवडेल असे हलके-फुलके व जोशपूर्ण संगीताचा साज त्यांना चढवला आहे. व्यक्तीगत प्रार्थना व चर्चमधील प्रार्थना सत्रांदरम्यानच्या मौलिक क्षणी ही गाणी आपल्या अंतःकरणात निर्माण झाल्याचे केनेथने नमूद केले आहे. ही गाणी साकारणारे शब्द त्याच्या अंतर्मनात परमेश्वरानेच रुजवले आहेत. हा अत्यंत सुंदर रचनेचा आणि हृदयंगम असा आल्बम असून तो श्रोत्यांना देवाच्या प्रेमाचा मानवी आकलनापलिकडे नेणारा अनुभव मिळवून देण्यास मदत करेल. केनेथ म्हणतो, “ही गाणी परमपवित्र देवाच्या कृपने स्फुरली असल्याने अनेकांसाठी वरदान ठरतील आणि अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवतील. याकामी माझ्या पालकांनी दिलेला पाठिंबा आणि प्रोत्साहन याबद्दलही मी आभारी आहे.” हा आल्बम विन्यार्ड वर्कर्स चर्चचे संस्थापक पास्टर पीटर सिल्वे आणि पास्टर जयश्री सिल्वे, तसेच वर्शिप लीडर प्रणीत कॅल्व्हिन, पास्टर पॉल सिल्वे व जीन सिल्वे यांच्या हस्ते नुकताच सादर करण्यात आला.
केनेथ पॉल सिल्वेचा ‘बेइंतेहा प्यार’ हा पहिला हिंदी ख्रिश्चन आल्बम सादर
Date:

