व्यक्तीमत्त्वाची चिरंतन छाप उमटवण्यासाठी सौंदर्यवर्धन करणे हा एखाद्याच्या दैनंदिन कार्यक्रमातील अविभाज्य भाग असतो आणि ते काम ‘ट्रुफिट अँड हिल’ (टी अँड एच) या लक्झुरियस बार्बरशॉप ब्रँडइतके उत्कृष्ट कुणीच करत नाही. ब्रिटनमधील महान राजांची सेवा केल्यानंतर ‘टी अँड एच’ तीच अजोड सेवा आणि आतिथ्य भारतभर व जगभर पुरवत आहे. भारतात हा ब्रँड ‘लॉइड्स लक्झरीज प्रायव्हेट लिमिटेड’चे कृष्णा गुप्ता व इस्तयाक अन्सारी यांनी सन २०१३ मध्ये भारत, नेपाळ, म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेश व व्हिएतनाम या देशांसाठीची मास्टर फ्रँचायसी लायसन्सेस प्राप्त करुन आणला. त्यानंतर प्रथमच ‘ट्रुफिट अँड हिल’ ग्लोबलच्या कार्यकारी संचालक जोआना ब्राऊटिन या केटी व ॲलिस ब्राऊटिन यांच्या समवेत भारताच्या दौऱ्यावर आल्या असून ‘टी अँड एच’ ब्रँडचा भारतात व जगात विस्तार करण्याची योजना त्यांनी आखली आहे.
यानिमित्त बोलताना इस्तयाक अन्सारी म्हणाले, भारतातील सौंदर्यवर्धन बाजारपेठेने पुरूषांच्या गरजांकडे बराच काळ दुर्लक्ष केल्याने ती मोठ्या संधींपासून दूर राहिली आहे. सुंदर दिसणे हे केवळ स्त्रियांचेच अधिकारक्षेत्र राहिले नसून आता पुरूष व महिला दोघेही आरशापुढे उभे राहून सौंदर्यवर्धन करतात. शहरी मध्यमवर्गीय लोकसंख्येतील वाढ आणि लहान शहरांमधील सुधारित वितरण चॅनल्स हेसुद्धा सन २०२० पर्यंत या क्षेत्राच्या प्रगतीला मोठी चालना देण्याची अपेक्षा आहे. यातून ‘टी अँड एच’ ब्रँडला आपली सर्वोत्तम सौंदर्य निगा उत्पादने व सेवा भारतातील विविध शहरांत वाढवण्याच्या भरपूर संधी आहेत. जोआना ब्राऊटिन यांचे भारतात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्या आता ‘टी अँड एच’साठी प्रगतीच्या संधी शोधणार असून पुरूषांच्या सौंदर्यवर्धन बाजारपेठेत विस्ताराची व्यूहरचना आखत आहेत.
जोआना ब्राऊटिन यांनी ‘ट्रुफिट अँड हिल’मध्ये कॉर्पोरेट रि-पोझिशनिंग प्रक्रिया सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रक्रियेअंतर्गत त्यांनी या ब्रँडच्या विपणन व्यूहरचनेत क्रांतिकारी बदल घडवले, कंपनीची प्रतिमा व ब्रँडच्या स्थितीकडे लक्ष पुरवले, तसेच उत्पादन संच आणि उत्पादनाचे पॅकेजिंग व सादरीकरण करण्याच्या शैलीचीही मोठ्या प्रमाणात फेररचना केली. या प्रक्रियेच्या यशातून ब्रँडची प्रचंड विश्वसनीयता निर्माण झाली, ज्याची लाभदायक फळे आजही ‘ट्रुफिट अँड हिल’ला मिळत आहेत. ‘ट्रुफिट अँड हिल’ ही जगातील पुरूष सौंदर्यवर्धन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनली असून त्यातूनच तिचा युनायटेड किंग्डम (युके) व आंतरराष्ट्रीय बाजारपेठा दोन्हींत झपाट्याने विस्तार झाला आहे. आजघडीला ‘टी अँड एच’ची उत्पादने जगभर विकली जातात आणि ‘टी अँड एच’च्या बार्बरशॉप्सची संख्याही सातत्याने वाढत चालली आहे. ही आऊटलेट्स लंडन, कॅनडा, अमेरिका, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, अझरबैजान, तसेच पश्चिम आशिया व दक्षिण कोरियामध्ये आहेत आणि लवकरच युरोपमध्येही आणखी स्टोअर्स उघडली जाणार आहेत.
‘ट्रुफिट अँड हिल’विषयी
‘ट्रुफिट अँड हिल’च्या गौरवशाली इतिहासाला वर्ष १८०५ मध्ये म्हणजे हिज मॅजेस्टी किंग जॉर्ज तृतिय यांच्या राजवटीत प्रारंभ झाला. तेव्हापासून त्यांच्या ग्राहकवर्गात राजघराण्यातील पुरुषांचा आणि शाही पाहुण्यांचा समावेश झाला. ‘ट्रुफिट अँड हिल’चे केशकर्तनकार हिज रॉयल हायनेस, ड्यूक ऑफ एडिंबर्गचे राजपरवानापत्र बाळगतात. ‘ट्रुफिट अँड हिल’ने आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सौंदर्यवर्धन उत्पादने व सेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या उच्चभ्रू ग्राहकवर्गात उद्योजक, संसद सदस्य, राजदूत व मुत्सद्दी व आमंत्रित नामवंतांचा समावेश आहे. ऑस्कर वाइल्ड, चार्ल्स डिकन्स, लॉर्ड बायरन, फ्रँक सिनात्रा, विन्स्टन चर्चिल, आल्फ्रेड हिचकॉक व लॉरेन्स ऑलिव्हिए ही या ग्राहकांतील काही प्रसिद्ध नावे होत. लंडनखेरीज ‘ट्रुफिट अँड हिल’ची लक्झुरियस बार्बरशॉप्स शिकागो, टोराँटो, बीजिंग, क्वालालुंपूर, सिंगापूर, बँकॉक, बाकू येथे आहेत, तर भारतातील ११ शहरांत १९ बार्बरशॉप्स आहेत.
‘ट्रुफिट अँड हिल’तर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट व आगळ्या सेवांमध्ये रॉयल शेव्ह अँड हेअरकट, क्लासिक शेव्ह अँड हेअरकट, अन्य हेअर ट्रिटमेंट्स, रॉयल मॅनिक्युअर अँड पेडिक्युअर, हेड मसाज, फेशियल्स आदींचा समावेश आहे, प्रत्येक भेटीत कॉम्प्लिमेंटरी वॅलेट सर्व्हिसेस, वाय-फाय, रिफ्रेशमेंट्स अशा सुविधांचा समावेश आहे. त्यांच्याकडे खास प्रसंग, व्यावसायिक बैठका अथवा निव्वळ आरामदायी अनुभूतीसाठी ‘रॉयल सूट’ नावाची खास व्हीआयपी रुमही सज्ज आहे.
ट्रुफिट अँड हिल ग्राहकांना उत्कृष्ट सौंदर्यवर्धन उत्पादने देते, ज्यात खास प्री-शेव्ह ऑइल, शेव्हिंग क्रिम, कलोन्स व आफ्टरशेव्हज्, बाथ अँड बॉडी प्रॉडक्ट्स, शॅम्पू व कंडिशनर, शेव्हिंग किट्स आदींचा समावेश आहे.

