जगातील सर्वांत जुने लक्झुरियस बार्बरशॉप असलेल्या लंडनच्या ‘ट्रुफिट अँड हिल’चे पुण्यात पदार्पण

Date:

·       पुण्यातील पहिले आऊटलेट कोरेगाव पार्कमध्ये सुरू

·       ‘ट्रुफिट अँड हिल’ची आता भारतात १९ आऊटलेट कार्यरत

 पुणे : ग्रेट ब्रिटनमधील राजघराण्याच्या सलग नऊ पिढ्यांचे २०० वर्षे केशसंवर्धन करण्याची कामगिरी नावावर असलेल्या लंडनच्या ‘ट्रुफिट अँड हिल’ या जगातील सर्वांत जुन्या लक्झुरियस बार्बरशॉपचे पुण्यात पदार्पण झाले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेचा वारसा कायम राखत ‘ट्रुफिट अँड हिल’ अत्याधुनिक सुविधांसह पुण्यातील प्रतिष्ठित अशा कोरेगाव पार्कमध्ये कार्यान्वित झाले आहे. ‘ट्रुफिट अँड हिल’च्या जगप्रसिद्ध केशसंवर्धन सेवांबरोबरच त्यांच्या पहिल्या स्पा सेवांचा लाभही पुणेकरांना घेता येणार आहे.

‘ट्रुफिट अँड हिल’ला भारतात आणण्याचा मान लॉईड्स लक्झरीज लिमिटेड या कंपनीकडे आहे. या कंपनीने या ब्रँडसाठी केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, म्यान्मार व व्हिएतनाम या देशांसाठीही मास्टर फ्रँचायसी लायसन्स प्राप्त केले आहे.

लॉईड्स लक्झरीज लिमिटेडची स्थापना वर्ष २०१३ मध्ये कृष्णा गुप्ता व इस्तयाक अन्सारी यांनी केली. पुरुषांना संपूर्ण आरामदायी वातावरणात अत्युच्च सुखावह केशसंवर्धन सेवा मिळवून देण्याच्या हेतूने कंपनी कार्यरत आहे. यासंदर्भात बोलताना कृष्णा गुप्ता म्हणाले, “ग्राहकांना आमच्यायेथून जाताना नवचैतन्याची अनुभूती मिळावी, हे आमचे उद्दिष्ट्य आहे. आम्ही केवळ सेवाच देत नसून अनुभवही देऊ करतो. आपल्या व्यक्तीमत्त्वाचे संवर्धन करणे ही दैनंदिन गरज असते. आम्ही त्याचे आलिशान अनुभवात रुपांतर करण्यासाठी उच्च प्रशिक्षित केशकर्तनकार व कर्मचाऱ्यांच्या मदतीने अत्यंत सुखावह वातावरणात सेवा देतो. आमच्या पुणे येथील स्टोअरचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथील स्पा सेवा, ज्या अलिकडेच आमच्या काही स्टोअरमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत. लवकरच त्या आमच्या भावी स्टोअर्समध्येही उपलब्ध करुन दिल्या जातील.”

हे स्टोअर कोरेगाव पार्कमध्ये २००० चौरस फूट प्रशस्त जागेत साकारले असून तेथे रीटेल सेक्शन, रॉयल सूट, बार्बरिंग सेक्शन, पेडिक्युअर सूट, फूट स्पा व दोन मसाज रुम्स अशा सुविधा आहेत. महोगनी लाकडांतून साकारलेली अभिरुचीपूर्ण अंतर्रचना व त्याला चिक ब्ल्यू वॉलपेपरची सजावट यामुळे येथे शांत व संपूर्ण आरामदायी वातावरणाची अनुभूती येते.

‘ट्रुफिट अँड हिल’ भारतासह जगभरातील अन्य १२ देशांमध्ये कार्यरत असून त्यांची आऊटलेट्स लंडन, कॅनबेरा, बाकू, टोराँटो, बीजिंग, शांघाय, साल्मिया, क्वालालुंपूर, सिंगापूर, बँकॉक, शिकागो, वॉशिंग्टन, तसेच भारतातील प्रमुख शहरांत आहेत.

याप्रसंगी बोलताना इस्तयाक अन्सारी म्हणाले, “आमची भारतभर सध्या ११ शहरांत १९ स्टोअर्स कार्यरत आहेत. ‘ट्रुफिट अँड हिल’ची ७ स्टोअर्स मुंबईत, ३ स्टोअर्स बंगळुरुत व नवी दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, चंडीगड, चेन्नई व पुण्यात प्रत्येकी एक स्टोअर आहे. आम्ही आमचे पहिले आंतरराष्ट्रीय स्टोअर बांगलादेशात ढाका येथे गुलशन ॲव्हेन्यूसारख्या उच्चभ्रू परिसरात उघडत आहोत.”

ट्रुफिट अँड हिल’विषयी

‘ट्रुफिट अँड हिल’च्या गौरवशाली इतिहासाला वर्ष १८०५ मध्ये म्हणजे हिज मॅजेस्टी किंग जॉर्ज तृतिय यांच्या राजवटीत प्रारंभ झाला. तेव्हापासून त्यांच्या ग्राहकवर्गात राजघराण्यातील पुरुषांचा आणि शाही पाहुण्यांचा समावेश झाला. ‘ट्रुफिट अँड हिल’चे केशकर्तनकार हिज रॉयल हायनेस, ड्यूक ऑफ एडिंबर्गचे राजपरवानापत्र बाळगतात. ‘ट्रुफिट अँड हिल’ने आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम केशसंवर्धन उत्पादने व सेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या उच्चभ्रू ग्राहकवर्गात उद्योजक, संसद सदस्य, राजदूत व मुत्सद्दी व आमंत्रित नामवंतांचा समावेश आहे. ऑस्कर वाइल्ड, चार्ल्स डिकन्स, लॉर्ड बायरन, फ्रँक सिनात्रा, विन्स्टन चर्चिल, आल्फ्रेड हिचकॉक व लॉरेन्स ऑलिव्हिए ही या ग्राहकांतील काही प्रसिद्ध नावे होत. लंडनखेरीज ‘ट्रुफिट अँड हिल’ची लक्झुरियस बार्बरशॉप्स शिकागो, टोराँटो, बीजिंग, क्वालालुंपूर, सिंगापूर, बँकॉक, बाकू, कॅनबेरा व सोल येथे आहेत.

‘ट्रुफिट अँड हिल’तर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट व आगळ्या सेवांमध्ये रॉयल शेव्ह अँड हेअरकट, क्लासिक शेव्ह अँड हेअरकट, अन्य हेअर ट्रिटमेंट्स, रॉयल मॅनिक्युअर अँड पेडिक्युअर, हेड मसाज, फेशियल्स आदींचा, तसेच कॉम्प्लिमेंटरी वॅलेट सर्व्हिसेस, वाय-फाय, रिफ्रेशमेंट्स अशा सुविधांचा समावेश आहे.

त्यांच्याकडे खास प्रसंग, व्यावसायिक बैठका अथवा निव्वळ आरामदायी अनुभूतीसाठी ‘रॉयल सूट’ नावाची खास व्हीआयपी रुमही सज्ज आहे.

ट्रुफिट अँड हिल कोरेगाव पार्क

पत्ता : ५, गॅलक्सी गार्डन, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क (स्टारबक्ससमोर), पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...