‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ हा ऊर्जा क्षेत्रातील महाक्रांतीचा महोत्सव – सीईओ आयुष प्रसाद

Date:

महावितरणकडून ‘आजादी का अमृत महोत्सव’ उत्साहात

पुणे, दि. २७ जुलै २०२२: निसर्गाच्या वैविध्येतेने नटलेल्या भारत देशातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात आता वीज पोहोचलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे हे फलित आहे. घरगुती, वाणिज्यिक, शेती, औद्योगिक व इतर सर्व वीजग्राहकांसाठी मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध आहे व देशाच्या प्रगतीचे चक्रे देखील विजेमुळेच वेगाने फिरत आहे. त्यामुळे ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त आयोजित ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ हा ऊर्जा क्षेत्रातील महाक्रांतीचा महोत्सव आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी केले.

केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तसेच ऊर्जा खातेअंतर्गत महावितरण, महानिर्मिती व महापारेषण यांच्या संयुक्त सहकार्याने बुधवारी (दि. २७) आयोजित ‘आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य, पॉवर@४७’ या ऊर्जा महोत्सवाचे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) सभागृहात उद्घाटन झाले. यावेळी श्री. आयुष प्रसाद बोलत होते. व्यासपीठावर आमदार श्री. अशोक पवार, प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार (महावितरण) व श्री. राजेंद्र गायकवाड (महापारेषण), पॉवर ग्रीडचे महाव्यवस्थापक श्री. एच. लल्लीयनसियामा, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, सीओईपीचे उपसंचालक श्री. मनोज राठोड यांची उपस्थिती होती.

गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातील वीजनिर्मितीची क्षमता ४ लाख मेगावॅटवर गेली असून शेजारच्या देशांमध्ये विजेची निर्यात करण्यात येत आहे. १ लाख ६३ हजार सर्किट किलोमीटर लांबीची एकच ग्रीड एकाच फ्रिक्वेन्सीवर सुरु असून त्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात १ लाख १२ हजार मेगावॅट विजेचे वहन करण्यात येत आहे. सन २०१५ मध्ये देशाच्या ग्रामीण भागात सरासरी वीजपुरवठ्याचा कालावधी साडेबारा तासांचा होता तो आता साडेबावीस तासांवर गेला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचविण्यासाठी २ लाख १ हजार ७२२ कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे व त्याद्वारे ३९२६ नवीन उपकेंद्र, ८ लाख ७३ हजार ३०३ सर्कीट किलोमीटरची उच्च व लघुदाब वाहिन्या व १ लाख २२ हजार १२३ कृषी वीजवाहिन्यांचे विलगीकरण व उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

या कार्यक्रमात पुणे जिल्हयातील विविध विद्युत योजनांचे लाभार्थी श्री. संतोष देशपांडे (पानशेत), श्री. संतोष कोकरे व श्री. विलास मोरे (ता. वेल्हे), रामचंद्र मोहोळ (ता. मुळशी), भास्कर कसबे (ता. हवेली), श्री. अनिल मेहर (ता. खेड), श्री. नागेश रणपिसे (राजगुरुनगर) आदींनी मनोगत व्यक्त करीत महावितरण व ऊर्जाखात्याला धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले तर प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले तर महेश कारंडे व भक्ती जोशी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी ऊर्जा खात्यांच्या विविध योजना व उपलब्धीबाबत लघुचित्रफित दाखविण्यात आल्या तर पथनाट्यांद्वारे विविध योजनांचा जागर करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...