Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी यांना मान्यता देण्याच्या ‘यूजीसी’च्या निर्णयाचे शिक्षण मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, यू१ विभाग यांच्याकडून कौतुक

Date:

 हे अभ्यासक्रम सादर करणाऱ्या पहिल्या व आघाडीच्या विद्यापीठांमध्ये आयएसयूएमचा समावेश ~

भारतातील क्रीडा शिक्षणात आदर्श बदल घडवून आणण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे व केलेल्या प्रयत्नांचे आयएसयूएम हे फलित ~

पुणे : भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयांमध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स या पदव्यांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) घेतला, त्याचे स्वागत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र, पुणे या संस्थेने केले आहे. क्रीडा शिक्षणाचे नामकरण करण्याची गरज लक्षात घेऊन समकालीन व भविष्याभिमुख अध्यापनशास्त्रात बदल निर्माण करण्यात महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सादर करून भारतात एक संघटित व संरचित “स्पोर्ट्स-एड” क्षेत्र निर्माण करण्यात अग्रेसर ठरलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकारातून साकार झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र हे राज्य सरकारच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे. भारतातील क्रीडा शिक्षणाच्या विविध घटकांना योग्य ती मान्यता मिळविण्यासाठी सुनील केदार यांनी ‘यूजीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत जवळून काम केले आहे. ‘बॅचलर्स इन स्पोर्ट्स सायन्स अॅंड स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ या पदवीला मान्यता मिळाल्याने देशातील क्रीडा नैपुण्याच्या परिसंस्थेमध्ये व्यावसायिता निर्माण होईल आणि १० अब्ज डॉलर मूल्याच्या क्रीडा व्यवस्थापन उद्योगात संधी उपलब्ध होण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच, यापूर्वी वित्तीय सेवा व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांत ज्याप्रमाणे महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य ठरले, त्याचप्रमाणे क्रीडा प्रतिभा समृद्ध करणारे एक अग्रणी राज्य म्हणून ते उदयास येईल.

माहाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले, “विविध क्रीडा प्रकारांतील विज्ञान व व्यवस्थापन यांत कुशल व्यावसायिक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने आपल्याकडे यापूर्वी क्रीडा शिक्षणामध्ये पुनर्कल्पना आणि परिवर्तन घडवून आणण्याचे एकमेव धोरण होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्याने आता तंत्रज्ञान, व्यवस्थापन, क्रीडा प्रशासन यातील विविध पैलूंचा समावेश करून क्रीडा शिक्षणात क्रांती घडवून आणणे आणि क्रीडा क्षेत्रात भारतातर्फे पराक्रम गाजवू शकतील, असे भविष्यातील क्रीडा व्यावसायिक तयार करणे, हे आमचे ध्येय तयार झाले आहे. ‘यूजीसी’च्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. यापुढे व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला भारतीय क्रीडा उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी त्यातील प्रतिभा, नोकऱ्या आणि क्रीडा बौद्धिक संपत्ती (आयपी) तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झेप घेता येईल, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो.”

पुण्यातील ‘आयएसयूएम’चे सक्षम अधिकारी ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, “भारतातील क्रीडा परिसंस्थेसाठी ही एक महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. क्रीडा विज्ञान आणि व्यवस्थापनातील भविष्यासाठीचे तयार अभ्यासक्रम सादर करणार्‍या भारतातील काही विद्यापीठांपैकी एक असल्याचा आम्हाला आनंद आहे. देशातील तरुणांच्या करिअरला चालना देणाऱ्या प्रमुख अभ्यासक्रमांमध्ये आता क्रीडा हा विषयही महत्त्वाचा ठरेल. अर्थात, या तरुणांना आपण क्रीडा शास्त्रात व्यावसायिक पद्धतीने घडविले पाहिजे. आमचे उद्योग तज्ज्ञ त्यांना क्रीडा व्यावसायिक बनण्यात मदत करतीलच. पुढील पाच वर्षांत क्रीडा उद्योग १० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने संपूर्ण क्रीडा समुदायाला नियोजित पद्धतीने उभे करण्यासाठी आपल्याला भविष्यात एक मजबूत ‘टॅलेंट फ्रेमवर्क’ तयार करणे आवश्यक आहे”

महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने पुण्यात गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना झाली. भारताचे माजी डावखुरे फिरकीपटू नीलेश कुलकर्णी हे या प्रकल्पात सरकारच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक आहेत. त्यांनी या संस्थेची मुख्य धोरणे निश्चित करण्यात आणि प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात मदत केली आहे.

“भारतातील क्रीडा शिक्षणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या कामाची ‘यूजीसी’ने दखल घेतली, याचा मला आनंद आहे. आपल्याला क्रीडा क्षेत्रातील विविध डोमेन्समध्ये पुढील स्तरावरची प्रगती साध्य करायची असेल, तर त्यातील पदव्यांसाठी मान्यता मिळणे ही काळाची गरज होती. महाराष्ट्र सरकारमध्ये मानद सल्लागार म्हणून मी काम केले आहे आणि गेल्या काही वर्षांत मला क्रीडा विज्ञान व व्यवस्थापन या क्षेत्रासाठी शैक्षणिक प्रमाणीकरणाची कमतरता जाणवली होती. ही बाब चिंताजनकच होती. याकरीता यातील अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार करून तो विकसीत करणे आणि क्रीडा शिक्षणात वैविध्य आणण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक सहयोग निर्माण करणे याची गरज होती. ‘आयएसयूएम’ची स्थापना केल्याने या प्रक्रियेत जलद प्रगती करण्याचे आमचे ध्येय साकार होणार आहे,” असे कुलकर्णी यांनी ‘यूजीसी’च्या अधिसूचनेबाबत म्हटले.

आयएसयूएम, पुणे या संस्थेने जगातील काही नामांकित विद्यापीठे आणि संस्थांशी करार केला आहे. ही विद्यापीठांची यादी पुढीलप्रमाणे :

अनु क्र.विद्यापीठाचे नाव
लफबरो युनिव्हर्सिटी
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना
नॉर्वेजियन स्कूल ऑफ स्पोर्ट सायन्सेस
युनिव्हर्सिटी ऑफ क्वीनलॅन्ड
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क
यॉर्क युनिव्हर्सिटी कॅनडा
युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगन, डेन्मार्क
जर्मन स्पोर्ट युनिव्हर्सिटी कलोन
मास्ट्रिच युनिव्हर्सिटी – नेदरलॅंड
१०युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी
११ओहियो युनिव्हर्सिटी
१२युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा
१३डीकीन युनिव्हर्सिटी
१४जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी
१५साऊथईस्टर्न ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटी

क्रीडा प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रात विविध डोमेन्समध्ये पात्र व्यावसायिकांना मोठी मागणी असून ४० लाखांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ‘यूजीसी’च्या मान्यतेमुळे आता माजी खेळाडूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्याकरीता कुशल व्यावसायिकांच्या निर्मितीसाठी क्रीडा शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात वसलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ही शारीरिक व क्रीडा शिक्षण, क्रीडा विज्ञान व क्रीडा वैद्यक, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यमे व संज्ञापन, क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण या विषयांचे अभ्यासक्रम राबविणारी पहिलीच शिक्षणसंस्था आहे. पहिल्या टप्प्यात, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी, क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील ३ वर्षांचा अभ्यासक्रम, तसेच क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण असा ३ महिन्यांचा कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. या संस्थेने क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन व क्रीडा व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ या संस्थांचेदेखील सहकार्य मागितले आहे; जेणेकरून एकत्रित आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करता येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...