पुणे- जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी जिल्ह्यातील ४ लाख नागरिक व सुमारे २ लाख पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था केल्यानंतर आता येथील दुष्काळग्रस्त गावांसाठी पाण्याच्या टाक्या देण्याचा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले.
शहरात विविध कार्यक्रम,लग्न समारंभ वा अन्य ठिकाणी जाताना बापट हे दुष्काळाची तीव्रता लोकांच्या निदर्शनास आणून देत व अनावश्यक खर्च टाळून दुष्काळी भागास यथायोग्य मदत करण्याचे आवाहन करीत.उद्यम विकास सहकारी बँकेनेही बापट यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि १० टाक्या भेट देण्याचे ठरवले,पुण्यातील विविध संस्थानी या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि आज दौंड इंदापूर भागासाठी एका अत्यंत ह्रद्य व अनौपचारिक कार्यक्रमात या टाक्या रवाना करण्यात आल्या.
उद्यम विकास बॅंके तर्फे टाक्या भेट देउन सामाजिक बांधीलकी जपण्यात आली.या वेळी बॅंकेचे अध्यक्ष दिलीप उंबरकर,उपाध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी ,संचालक संदीप खर्डेकर,महेश लडकत,मनोज नायर,सीताराम खाडे,गोकुळ शेलार,मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे तसेच अनेक हितचिंतक उपस्थित होते.उद्यम विकास सहकारी बँकेने वर्धापन दिनाचा अनावश्यक खर्च टाळून टाक्या भेट दिल्या हे स्तुत्य असून समाजातील इतर घटकांनी ही याचा आदर्श घ्यावा असे यावेळी बापट म्हणाले.श्री दिलीप उंबरकर व श्री संदीप खर्डेकर यांच्या हस्ते टाक्यांचे पूजन करून वितरणासाठी प्रभारी निवासी उप जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण याना सुपूर्द करण्यात आल्या.




