मुंबई- अत्यल्प पगारावरील कंत्राटी दाखविलेल्या पत्रकारांच्या जीवावर वृत्तपत्रे मोठी करून त्यानंतर अनेक शासकीय सवलती भूखंड लाटून गलेलठ्ठ झाल्यानंतर ‘त्याच’ पत्रकारांना बेरोजगारीच्या खाईत ढकलून राज्यभर, देशभर मिरवणाऱ्या वृत्तपत्र मालकांना तुम्ही ताळ्यावर आणून पत्रकारांवरील अन्याय दूर करणार कि नाही ? असा सवाल एनयूजे च्या महाराष्ट्र अध्यक्षा शीतल करदेकर यांनी केला आहे. गेल्या वर्षातील मार्च महिन्यापासून कोरोना आणि लॉकडाऊन चे निमित्त करून काही वृत्तपत्र मालकांनी अनेक जुन्या ज्येष्ठ पत्रकारांचे पगार , फंड देखील बुडवून त्यांना रस्त्यावर आणण्याचे काम केले आहे . या पार्श्वभूमीवर करदेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे खालील मागण्या केल्या आहेत.
1)कोरोना कालावधीत कामावरून कमी केलेल्या ,राजीनामा घेतलेल्या मिडिया कर्मचाऱ्यांना संबंधित मालकांनी महिना 15 हजार रूपयांची मदत करावी
2)ज्यांना तुटपुंजे वेतन ,मानधन मिडियामालक देताहेत त्यांना हक्काचे पैसे तातडीने मिळावेत
3)**जे मालक देणार नाहीत ,त्याच्या सर्व संपत्तीचा विचार व्हावा आणि चौथा स्तंभ म्हणून ज्या जमिनी ,घरं मिळवली आहेत ती ताब्यात घेऊन ते पैसे कर्मचाऱ्यांना द्यावेत!
3)आमदार ,खासदारांनी आपल्या भागातील माध्यमकर्मीना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची सहायता करावी!
4) अनेकांचे घरांसाठी कर्ज घेतली आहेत,बँका हप्त्यासाठी तगादा लावतात!
जिथे जगणं कठीण आहे,तिथे हप्ते कसे भरणार?
*बँकांना हप्त्यासाठी किमान वर्षभराची सूट द्यावी असे निर्देश सरकारने द्यावेत!
5)मुक्त पत्रकार,नियतकालिक पत्रकार ,फोटो,विडियो जर्नलिस्ट्स,वेबपोर्टल, युट्युब चॅनल्स आदि मिडियाशी संबंधित सर्वश्रमिक कर्मचारी ( ज्याची उपजीविका फक्त मिडियातील कामावर आहे)यांचेबाबत सरकारने सहायता करावी!
आम्हीही माणसं आहोत,सन्मानाने जगण्याचा आम्हाला अधिकार आहे,आणि आम्हाला आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे!
ते सरकारने पूर्ण करावे!
सरकार,प्रशासनातील संबंधितानी तरतूद नसेल तर ती तातडीने करावी! असेही करदेकर यांनी म्हटले आहे.

