मुख्यमंत्रीपदासह आमदारकीचाही त्याग करतोय- उद्धव ठाकरे

Date:

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला , मी शिवसेना भवनात जाईल तिथून सेनेची सर्व जबाबदारी संभाळेनअसे ते म्हणाले.शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचल्याचे पुण्य त्यांना मिळू द्या, असे भावनिक आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री साडेनऊ वाजता फेसबुक लाइव्हवरून राजीनामा देण्याची घोषणा केली. मला माझ्या शिवसैनिकांच्या रक्ताची होळी खेळायची नाही. मला मुख्यमंत्री पदच काय, आमदारकीही नको. उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी, “आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिया गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आज निर्णय घेतांना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला,” असं म्हणत सहकारी पक्षांचे आभार मानले.

“ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं ते हिमतीने सोबत आहे, याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसेना,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्यासाठी शिवसेना भवनावर येणाऱ्या समर्थकांचे आभार मानले. “राज्यपाल महोदयांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी लोकशहीचा मान राखलात, एक कॉपी दिल्यावर २४ तासात आदेश दिला,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये राज्यपालांचे आभार मानले. तसेच विधानपरिषदेच्या १२ आमदारांची यादी राज्यपालांनी मंजूर केली असती तर मान अधिक वाढला असता, असंही म्हटलं.

“काँग्रेस बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार होती, अशोक चव्हाण मंत्रीमंडळ बैठकीनंतर म्हणाले की आम्ही बाहेर पडतो, पण त्यांना सांगा असं वेड्यासारखं वागू नका,” असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. डोकी फक्त मोजण्यासाठी वापरायची की कामासाठी?, असा प्रश्न विचारत आपल्याला डोकी मोजण्याची इच्छा नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली. “मला तो खेळच खेळायचा नाहीय. मला प्रमाणिकपणे असं वाटतं की शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य मिळत असेल तर ते त्यांना मिळू द्या,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

शिवसैनिकांनी आमदारांच्या आडवे येऊ नये

यावेळी त्यांनी राज्यात कोणत्याही शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये असे आवाहन केले आहे. उद्या कोणत्याही शिवसैनिकांनी अस्तित्वात येणाऱ्या नव्या सरकारच्या मधे येऊ नये त्यांना त्यांचा गुलाल उधळू द्या असे म्हटले आहे. उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. हा सोहळा जबरदस्त झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ, असेही ठाकरेंनी सांगितलं.

सत्तेसाठी आम्ही हपापलेले नाही

आम्ही हपालेले होऊन जात नाही, मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊन घेऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय, असे उध्दव ठाकरे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...