डिपॉझिट जप्त होणाऱ्या पक्षाने आपला वापर सत्तेसाठी करून घेतला, आता दुर्लक्ष नको,संधीचे सोने करून घ्या – उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद

Date:

मुंबई-: डिपॉझिट जप्त होणाऱा पक्ष आपल्या मुळे वाढला, त्यांनी आपला वापर केला , संधी असताना आपण तेव्हा राज्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही.तेव्हा इतर राज्यातील निवडणुका लढवल्या असत्या तर आज आपला पंतप्रधान असु शकला असता. शिवसेनेला बाहेरील राज्यात जाण्याची संधी होती. पण देश त्यांच्यासाठी महाराष्ट्र आपल्यासाठी हे वचन दिले होते. त्यामुळे राज्याबाहेर गेलो नाही. तेव्हा इतर राज्यातील निवडणुका लढवल्या असत्या तर आज आपला पंतप्रधान असु शकला असता , आता सत्तेत आहोत संधीच सोनं करुन घ्या. प्रतिस्पर्धी,सोबतचे पक्ष लहान लहान निवडणुक जीव ओतून लढतात. आपण,त्याकडे दुर्लक्ष करतो. एकहाती, दोन हाती सत्ता आणायची तर फक्त बेडकी फुगवून चालणार नाही त्यासाठी हातात बळ हवे.आता प्रत्येक निवडणुक जिंकायचीच, असे आदेशच रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना दिले. संस्था निर्माण करा,सहकारात या असे सांगत उध्दव ठाकरे यांनी गावा गावात पक्ष मजबूत करण्याचे आदेशच कार्यकर्त्यांना दिले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला.काही दिवसांपुर्वी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे म्हणाले, ‘आपल्याला यावेळी पुर्वीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहे. पण, आपण चौथ्या स्थानावर आहोत’ अशी नाखुशीही ठाकरे यांनी व्यक्त केली. आपण आता सत्तेत आहोत त्या संधीचे सोने करुन घ्या.गावा,गावात संस्था निर्माण करा.सहकारात या असे आदेशच ठाकरे यांनी दिले.

भाजपने आपला वापर केला

डिपॉझिट जप्त होणाऱा पक्ष आमच्या मुळे वाढला. त्यांनी आमचा वापर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी मी गेलो होता. मग आमचे चेहरे वापरले नाहीत का असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणुका एकट्याने लढण्याची आमची तयारी आहे. तुम्हीही एकट्याने लढा. मागून ते ईडी, इनकम टॅक्स आणू नका असा टोलाही त्यांनी लगावला.आम्ही 25 वर्ष युतीत सडलो. संधी मिळाल्यावर आम्हालाही संपवायचा विचार होता.त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले.आम्ही शपथ दिवस उजाडण्यापुर्वी घेतली नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. हे आपलं मित्र होते याचं दुख आहे.ते स्वत:च्या काळीजीनेच संपणार आहे.लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार आहे.तेव्हा भगव्याचे तेज यांना दिसेल असेही ठाकरे यांनी नमुद केले.ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपला सोडलं म्हणजे हिंदूत्व सोडलं नाही. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, त्यांनी सत्तेसाठी हिंदूत्वाच कातडं पांघरलंय. काही राज्यात गोवंश हत्या बंदी आणि दुसऱ्या राज्यात अशी बंदी नाही. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत एकच सुत्र हवे. यांचे सुत्र सत्तेसाठी हिंदूत्व आहे. आपलं हिंदूत्वसाठी सत्ता हे सुत्र आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपला फटकारले.बाबरी पडल्यानंतर शिवसेनेला बाहेरील राज्यात जाण्याची संधी होती. पण देश त्यांच्यासाठी महाराष्ट्र आपल्यासाठी हे वचन दिले होते. त्यामुळे राज्याबाहेर गेलो नाही. पण आता पर राज्यातही निवडणुक लढणार असेही त्यांनी नमुद केले. आता गुलामगिरीसारखी परिस्थिती आहे. गप्प बसलो तर पुन्हा ब्रिटीश काळासारखी परीस्थीती येईल. त्यासाठी शिवसेना मैदानात हवी असेही त्यांनी नमुद केले.

ममता बॅनर्जी यांची कौतुक

तेव्हा सोबत असलेले पक्ष आता त्यांच्या बरोबर नाही. संघ मुक्त भारताची घोषणा करणारे,मो दींना विरोध करणारे पक्ष त्यांच्या सोबत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वाघिणीसारख्या लढल्या. आता पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही. आपणही वाघा आहोत तसेच लढले पाहिजे, अशा शब्दात बॅनर्जी यांचे कौतुक करत ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मैदानात उतरण्याचे आदेश दिले.

…तर शिवसेनेचा पंतप्रधान असता : उद्धव ठाकरे

शिवसेनेने संधी असताना राज्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही.तेव्हा इतर राज्यातील निवडणुका लढवल्या असत्या तर आज आपला पंतप्रधान असु शकला असता.पण,आता निवडणुका लढवणार असेही ठाकरे यांनी नमुद केले.आपला विरोधी पक्ष,सोबतचे पक्ष लहान लहान निवडणुकाही ताकदिने लढतात.आपलं त्याकडे दुर्लक्ष होते.नेतेही त्याकडे जास्त लक्ष देत नाही.यात माझाही दोष आहे.अशी कबुली देत ठाकरे पुढे म्हणाले,’आपण फक्त लोकसभा,विधानसभा निवडणुकांवर लक्ष देतो.पण,आता बँकापासून ग्राम पंचायती पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या.

निकालाच्या दिवशी दांडी गुल

मतदानाच्या संध्याकाळ पर्यंत आपला उमेदवार जिंकण्याचा आत्मविश्‍वास असतो.पण,मतमोजणीच्या दिवशी दांडी उडालेली असते.मग,याने त्याने गद्दारी केल्याचे सांगितले जाते.आता असे करायचे करायचे नाही.प्रत्येक निवडणुक जिद्दीने लढायची असेही ठाकरे यांनी नमुद केले.

पक्षातून निघून जा

विधानपरीषदेच्या दोन जागा आपण गमावल्या. त्यावेळी आपल्याच लोकांनी गद्दारी केल्याचे सांगितले. आता अशी गद्दारी करणारे पक्षात नसतील, अशी खात्री आहे. तरीही जे कोणी असतील त्यांना थेट पक्षातून निघून जावे. अगदी मुठभर शिवसैनिक राहीले तरी आपण पक्ष वाढवू शकतो, असे प्रतिपादनही त्यांनी केले.इंग्रजांच्या काळासारखी आता परिस्थिती आली आहे. आणिबाणीला विरोध करणारे आता तसेच वागत आहे.आता गप्प बसलो तर पुन्हा गुलाम होऊ. हे रोखायचे असेल तर शिवसेना  मैदानात हवी, अशा शब्दात भाजपवर हल्ला चढवत या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखविण्यासाठी लवकरच महाराष्ट्र  पिंजून काढणार, असे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नमुद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...