Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केवळ सशस्त्र दलांना सेवा देण्यासाठी ‘उडचलो’चा रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश

Date:

  • सशस्त्र दलांसाठी दर्जेदार, परवडणारी घरे आता ‘उडचलो’च्या माध्यमातून सर्वोत्तम सवलतीच्या दरात उपलब्ध .
  • सशस्त्र दलांना सर्वाधिक हव्या असलेल्या ५ प्रमुख शहरांमध्ये प्रवेश करण्याची ‘उडचलो’ची योजना .
  • रिअल इस्टेट व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून अभिजित दास यांची नियुक्ती .

पुणे –  केवळ भारताच्या सशस्त्र दलांना सेवा देणाऱ्या ‘उडचलो’ या कन्झ्युमर टेक कंपनीने आता रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केला आहे. कंपनीने याबाबतची घोषणा आज केली. संरक्षण खात्यातील आजी व माजी कर्मचारी आता ‘उडचलो’च्या माध्यमातून सवलतीच्या बाजारभावात परवडणारी घरे खरेदी करू शकतील. ‘‘उडचलो अॅश्युरिटी’ अशी हमी या ब्रँडतर्फे देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘उडचलो’द्वारे होणारी रिअल इस्टेटची सर्व खरेदी ही गुणवत्तापूर्ण, परवडणारी व फायदेशीर असणार आहे. संरक्षण खात्याचे कर्मचारी आता ‘उडचलो’च्या माध्यमातून वास्तविक बाजारभावापेक्षा किमान १० टक्के सवलतीत मालमत्ता खरेदी करू शकतील.

सशस्त्र दलांचे प्राधान्य असलेल्या सर्व शहरांमध्ये हा उपक्रम सादर करण्यात येत आहे. यांमध्ये सर्वप्रथम पुणे शहरात ही सेवा देण्यात येईल आणि त्यानंतर चंडीगढ, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू आणि जयपूर यांसारख्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची योजना ‘उडचलो’ने आखली आहे. या ब्रँडतर्फे या शहरांमधील नामांकित विकसकांशी चर्चा करण्यात येत असून त्यातून खरेदीचे अधिक चांगले पर्याय आणि ग्राहकांसाठी घरखरेदीची सुरळीत प्रक्रिया या गोष्टी सुनिश्चित होतील.

पुणे शहरासाठी ‘उडचलो’ने प्रख्यात ‘न्याती डेव्हलपर्स’शी हातमिळवणी केली आहे. या विकसकाकडील सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्र सवलतीच्या दरात आजी व माजी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. या विकसकाने वाघोली येथील एक टॉवर सशस्त्र दलांसाठी डिझाइन करून समर्पित केला आहे. शाळा, रुग्णालये, बाजारपेठा व इतर आवश्यक गोष्टींसह अनेक सुविधा या प्रकल्पातील मालमत्तेच्या सान्निध्यात उपलब्ध आहेत.  

उडचलोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “व्यवसायामध्ये वैविध्य आणण्याची ही कृती आम्ही विचारांती आणि बऱ्याच संशोधनानंतर अमलात आणत आहोत. गेल्या वर्षी ‘उडचलो’च्या कर भरण्याच्या सुविधेद्वारे जितका कर भरला गेला, त्यातील ९९ टक्के प्रकरणांमध्ये, प्राप्तीकर कायद्याच्या कलम २४नुसार घरमालकांना मिळू शकणाऱ्या करकपातीचा, प्रत्येकी २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ संबंधितांनी घेतला नव्हता. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत मिळणारे लाभही देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या आपल्या सैनिकांनी कधी मिळवले नाहीत. ‘देशसेवा करणाऱ्यांना सेवा’ या आमच्या ब्रीदवाक्याशी आम्ही ठाम आहोत. आताच्या आमच्या उपक्रमामुळे, संरक्षण दलातील या समुदायाला अधिकाधिक फायदे होतील, या दृष्टीने बचतीचे सर्व पर्याय अवलंबण्यात येतील. सर्वसामान्य नागरी रहिवाशांच्या तुलनेत, सशस्त्र दलाच्या सेवेत असणाऱ्यांना घरखरेदी करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, कारण त्यांच्या गरजा विशिष्ट स्वरुपाच्या असतात. योग्य मालमत्ता कशी ओळखायची; कर्जाची सुविधा कशी मिळवायची; शाळा, लष्कराच्या छावण्या, रुग्णालये आणि इतर सुविधांचे सान्निध्य कसे ओळखायचे आणि सर्वात महत्त्वाचे, म्हणजे बिल्डर कायदेशीर औपचारिकता पूर्ण करेल का; आपल्या सुटीच्या काळात तो कायदेशीर तरतुदींचे पालन नेमकेपणाने करेल का, असे अनेक प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभे असतात. या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक पद्धतीने देणाऱ्या, सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या विकसकांशी ‘उडचलो’ची टीम संपर्क साधेल आणि सर्वोत्तम दर्जाची घरे अतुलनीय किंमतींत, विनासायास उपलब्ध करून देईल. याकरीता ‘उडचलो’ कटिबद्ध आहे.”

‘उडचलो’चे मुख्य व्यवसाय अधिकारी अभिजीत दास हे कंपनीच्या रिअल इस्टेट व्यवसायाचे नेतृत्व करणार आहेत. अभिजित हे यापूर्वी रिअल इस्टेट, वित्तीय सेवा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उद्योगांमध्ये नवउद्योजक आणि कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह या पदांवर कार्यरत होते. पूर्व भारतातील जेएलएल व्यवसायाच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांना रिअल इस्टेट उद्योगाचे विस्तृत ज्ञान आहे. त्यांच्या या विपुल ज्ञानामुळे व कौशल्यामुळे ‘उडचलो’ला नवीन व्यवसाय विभाग वाढवण्यात मदत होईल. ‘उडचलो’ला या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे आणि या विभागातील ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत.

आपल्या या नियुक्तीबद्दल बोलताना उडचलोच्या रिअल इस्टेट विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी अभिजित दास म्हणाले, “रिअल इस्टेट क्षेत्राच्या गरजा आणि संरक्षण दलांच्या मागण्या यांकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष झाले आहे. ‘उडचलो’ने या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे, हा विशिष्ट ग्राहकवर्ग आता प्रमुख शहरांमधील काही उत्कृष्ट विकासकांच्या सर्वोत्तम सवलतींचा लाभ घेऊ शकेल. ‘उडचलो’च्या या उपक्रमात सहभागी होण्याबाबत मी खूप उत्साहित आहे. या बाजारपेठेत परिवर्तन घडवून आणण्यास आणि आपल्या जवानांना सेवा पुरविण्यास आम्ही आतुर झालो आहोत.”

‘उडचलो’ ही कंपनी २०१५ पासून लष्करी जवानांना सेवा पुरविण्यास समर्पित दृष्टीने काम करीत आहे. सोयीस्कर प्रवासाची सोय करून देणे, दैनंदिन सुविधांची बिले भरणे, वित्तीय सेवा पुरवणे आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे व्यवहार करणे अशी कामे ही कंपनी करीत असते. रिअल इस्टेट या नवीन क्षेत्रात प्रवेश करून ‘उडचलो’ कंपनी ३० लाख जवानांपर्यंत पोहोचणार आहे. सध्या हे कर्मचारी घरांच्या बाबतीत केवळ ‘एडब्ल्यूएचओ’ आणि ‘एअर फोर्स नेव्हल हाऊसिंग बोर्ड’ या संस्थांवर अवलंबून होते. या विभागाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दर्जेदार आणि परवडणारी घरे उपलब्ध करण्याचे काम या संस्थांमधून आतापर्यंत होत होते.

‘उडचलो’मधील टीम बांधकामाच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण करेल आणि कायदेशीर, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर इत्यादी विविध मापदंडांवर अंतर्गत व बाह्य लेखापरीक्षकांकडून त्याचे मूल्यांकन करेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कामगार आणि कष्टकरी...

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याची परंपरा

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याचा...