यूसीमासचा बक्षिस समारंभ संपन्न
महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील १५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे, : युनिव्हर्सल काॅन्सेप्ट मेंटल अरथमॅटिक सिस्टिम (यूसीमास) तर्फे पुणे रिजन अबॅकस अॅण्ड मेंटल अरथमॅटिक या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा बालेवाडी स्टेडियम येथे पार पडली. याचा बक्षिस समारंभ काल (१५ जानेवारी) रोजी टिळक स्मारक मंदिर येथे पार पडला. सुमारे २०० विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.यामध्ये ५-१२ वयोगटातील सुमारे १५४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर आदी शहरातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कारीया उपस्थित होत्या.
ही स्पर्धा दृष्यात्मक आणि संवादात्मक अशा दोन विभागात झाली. दृष्यात्मक विभागामध्ये ८ मिनिटात दोनशे प्रश्न सोडवायचे होते, जे कॅलक्यूटेलरच्या साह्याने सोडवणे अवघड जाते. संवादात्मक विभागात क्रमांक सांगितले जात होते आणि मुलांना त्याचे उत्तर काढून पुरविण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेत लिहायचे होते. यामध्ये ३ अंकी, ३० ओळींची बोरीज-वजाबाकी एका क्षणात करताना पाहून त्यांचा पालकांना आश्चर्य वाटत होते. यूसीमास ही प्रादेशिक स्पर्धा वर्षातून एकदा आयोजित केली जाते. यामध्ये १२ जिल्ह्यातील मुले सहभागी होतात.
यूसीमासच्या संचालिका रश्मी इंदुलकर म्हणाल्या, यामध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलांचे अभिनंदन. विजेत्यांना ट्रॉफी देऊन गौरविलेच पण त्याबरोबरच जे सहभागी झाले होते त्यांना देखील गौरविले. यामुळे त्यांना देखील प्रेरणा मिळते.
पुणे केंद्राचे संचालक नितीन बेंद्रे म्हणाले, आमच्या केंद्रे तर्फे या स्पर्धेसाठी भरपूर सराव करू घेतला जातो. अशा स्पर्धेतून त्यांच्या कौशल्याला चालना मिळते. ही स्पर्धेसाठी देण्यात येणार्या प्रशिक्षणातून मुलांच्या मेंदूचा विकास होतो. यावेळी अनेक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. शाळा विभागात दिल्ली पब्लिक स्पर्धा, बिशपस् स्कूल (कल्याणीनगर) आणि विखे पाटील स्कूलचा अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा नंबर आला क्रमांक पटकावला.