दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दाेन जणांना अटक

Date:

पुणे-पुण्यातील नऱ्हेगाव याठिकाणी राहणाऱ्या तरुणाने काेराेना काळात आर्थिक अडचणींमुळे दाेन जणांकडून प्रतिमहिना 10 आणि 8 टक्के व्याजदाराने 10 लाख रुपये उसने घेतले हाेते. मात्र, सदर पैशांची व्याजासह परतफेड करुनही आणखी दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दाेन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विराेधी पथकाने अटक केली आहे.

अतुल निवृत्ती भूमकर या 33 वर्षीय तरुणाने राहुल बाळकृष्ण काेंढरे (वय 42, आंबेगाव बुद्रुक, पुणे) व विजय गणपत कुंभारकर (38, रा. धायरी, पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत आराेपींवर भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार 1 जून 2019 ते 23 ऑगस्ट यादरम्यान घडला आहे.

मुद्दल-व्याज देऊनही 10 लाखांची मागणी

तक्रारदार अतुल भुमकर यास आर्थिक अडचण आल्याने त्याने राहुल काेंढरे यांच्याकडून पाच लाख रुपये दहा टक्के प्रति महिना व्याजदराने घेतले हाेते. तर विजय कुंभारकर यांच्याकडून पाच लाख रुपये प्रति महिना 8 टक्के व्याजदाराने घेतले हाेते. त्यापैकी राहुल काेंढरे यांना चार लाख 80 हजार रुपये व मुद्दल दाेन लाख रुपये परतफेड करण्यात आली हाेती. विजय कुंभारकर यांना 8 टक्के व्याजदाराने प्रति महिना 40 हजार रुपयांप्रमाणे 5 लाख रुपये तसेच व्याज म्हणून एक लाख 57 हजार रुपयांचे स्टील व मुद्दल तीन लाख रुपये घेतले.

खंडणी विराेधी पथकाकडे तक्रार

मात्र पैसे परत दिल्या नंतरही आराेपी राहुल काेंढरे व विजय कुंभारकर हे तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी पाच लाख रुपयांची अवाजवी मागणी करत हाेते. तक्रारदाराने यास नकार दिल्याने आराेपींनी त्याच्या घरात शिरुन त्यास शिवीगाळ व मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आणखी दहा लाख रुपयाची दाेघांनी मागणी केल्याने यबाबत तक्रारदार यांनी खंडणी विराेधी पथकाकडे जाऊन तक्रार दिल्याने दाेन्ही आराेपींना पाेलिसांनी अटक केली. यबााबत पुढील तपास खंडणी विराेधी पथक-2 चे पाेलीस उपनिरीक्षक एस. जाधव करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना. पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या...

मेट्रो च्या विस्ताराला गती द्या..विकास मठकरींनी घातली साद

हिंजेवाडी ते शिवाजीनगर कोर्ट —मेट्रो कधी धावणार ??पुणेकर नागरीकांना...