तलवारीच्या धाकाने वृत्तपत्र विक्रेत्याला लुटणारे दोघे अटकेत

Date:

  • दत्तावाडी पोलिसांची कामगिरी

पुणे- तलवारीच्या धाकाने वृत्तपत्र विक्रेत्याला लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. गौरव उर्फ लाल्या सुहास फडणीस (वय-३० वर्षे रा. पर्वती दर्शन, पुणे), अक्षय उर्फ पप्पू कैलास गरुड (वय-२२ वर्षे, रा. अप्पर इंदिरानगर, व्हीआयटी कॉलेज माहे, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. ४ मार्च रोजी पुणे सातारा रोडवरील लक्ष्मीनारायण थियेटरजवळ पहाटेच्या सुमारास वृत्तपत्र विक्रेते शंकर खुटवड यांना आरोपी गौरव व अक्षय हे तलवारीच्या धाकाने लुटून पळून गेले होते. ५ मार्च रोजी दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे व प्रमोद भोसले यांना वरील गुन्ह्यातील आरोपी जनता वसाहत पर्वती येथील लोखंडी पुलाजवळ कोणालातरी भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार यांनी स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील आरोपींनी आणि त्यांच्या आणखी काही साथीदरांनी मिळून हा गुन्हा केल्याचे त्यांनी काबुल केले आहे. तसेच आरोपींनी हा गुन्हा पैश्यांच्या चणचणीमुळे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

वरील आरोपी आणि त्यांच्या साथीदारांवर पुणे शहरातील दत्तवाडी, बिबवेवाडी, स्वारगेट वारजे माळवाडी तसेच ग्रामीण भागातील सासवड, सांगली, घोडेगाव, पौड इ. पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे करीत आहेत.

सदरची कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ-३ च्या पोलीस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड, सिंहगड विभागाच्या सहा. पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक स्वप्नील लोहार, पो. हवा. कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजू जाधव, पो.अं. महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले व विष्णू सुतार यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related