बारा रुग्णांनी ‘कोरोना’वर केली मात, मुंबईतील 8 रुग्णांना घरी सोडले

Date:

मुंबई – मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १२ रुग्णांनी कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या साथीवर विजय मिळवला आहे. पाॅझिटिव्ह असलेल्या या १२ रुग्णांच्या दोन स्राव चाचण्या चक्क निगेटिव्ह आल्या आहेत. त्यातील ८ रुग्णांना मंगळवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले. तर, इतर ४ रुग्णांना दोन-चार दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार आहे.राज्यातील पाॅझिटिव्ह असलेले १५ कोरोनाग्रस्त पूर्णत: बरे झाले असून त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. यातील १२ मुंबईचे असून २ पुण्यातील आणि १ औरंगाबादमधील रुग्ण आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.

बृहन्मुंबई महापालिकेने या रुग्णांचा घरी जातानाचा फोटो मंगळवारी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये डॉक्टर, नर्स सोबत एक व्यक्ती आणि लहान मुले दिसत आहेत. कस्तुरबा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अथक प्रयत्न केले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळेच रुग्ण बरे होऊन आपल्या घरी जाऊ शकले.

आपल्याला या महामारीच्या आजारातून वाचवल्याबद्दल डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांनी त्यांच्यावर उपचार करणारे डाॅक्टर्स व नर्स यांचे आभार मानले. पाॅझिटिव्ह असलेल्या १२ रुग्णांना निगेटिव्ह करण्यात कस्तुरबाच्या डाॅक्टरांना यश आल्यामुळे काेरोनावर मातही करता येते, असा विश्वास आरोग्य यंत्रणेत निर्माण झाला आहे. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना घरी गेल्यानंतरही १४ दिवस आयसोलेशनमध्ये म्हणजे एकटे राहण्यास सांगण्यात आले आहे. पालिकेचे डाॅक्टर त्यांच्या प्रकृतीवर कायम लक्ष ठेवून राहणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. दक्षा शहा यांनी दिली. गेल्या २४ तासांत मुंबईत ८४१ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ९४ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. त्यातील ५ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यात ४ मुंबईचे, तर एक रुग्ण बाहेरचा आहे.

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्पा सेंटरवर कारवाई; बिल्डिंगवरून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पुरुष जखमी

पुणे- विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमधील ‘द...

विमान अपघातात प्रचंड वाढ:आता एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश, सर्व जणांचा मृत्यू

रांचीहून दिल्लीला जात होते विमानरांची- झारखंडहून दिल्लीला जाणारे एक...

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...