Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

टीव्हीएस मोटर कंपनीतर्फे टीव्हीएस ज्युपिटर १२५ सादर

Date:

·         ईटीएफआय आणि इंटेलीगो यांच्यासह नवीन १२५ सीसी इंजिन, प्रवेग आणि मायलेज यासाठी श्रेणीत सर्वोत्तम

·         उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम: सीटच्या खाली ३३ लीटरची मोठी डिकी. दोन मोठ्या आकाराची हेल्मेट्स व्यवस्थित बसणार, सर्वात लांब सीट

·         अद्वितीय: प्रगतीशील स्टायलिंग, एलईडी हेडलँप, पुढच्या बाजूला बाह्य इंधन भरणा टाकी, मेटलमॅक्स बॉडी

होसूर, ७ ऑक्टोबर २०२१: दुचाकी आणि तीनचाकी वाहनांमधील जगातील नामवंत कंपनी असणाऱ्या टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस ज्युपिटर १२५ सादर करत असल्याचे आज जाहीर केले. टीव्हीएस ज्युपिटरच्या पोर्टफोलिओमध्ये ही नवीन भर घालताना १२५ सीसीच्या या स्कूटरने ज्यादा से भी ज्यादा वैशिष्ट्य जपले आहे. मोठी आणि अधिक आरामशीर जागा यांसह या क्षेत्रातील पहिले प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सीटच्या खाली सर्वात जास्त मोठी डिकीची जागा, सर्वात लांब सीट, नाविन्यपूर्ण प्रगतीशील स्टायलिंग आणि उत्तम मायलेज ही या स्कूटरची वैशिष्ट्ये आहेत.

या सादरीकरणावेळी टीव्हीएस मोटर कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केएन राधाकृष्णन म्हणाले, “टीव्हीएस मोटर कंपनीमध्ये आम्ही नेहमी स्कूटरायझेशन, प्रीमियमायझेशन, ब्रँड्स मध्ये गुंतवणूक आणि उत्पादन नाविन्यपूर्णता या चार घटकांवर लक्ष केंद्रित करतो. २०१३ मधील सुरुवातीपासून, टीव्हीएस ज्युपिटर ही देशातील सर्वाधिक पसंतीच्या स्कूटर्स पैकी एक राहिली आहे. या विभागातील गाड्यांमधील अनेक वैशिष्ट्ये त्यांनी या क्षेत्रात सर्वप्रथम सादर केली. आजचा स्कूटर ग्राहक आपल्या वैयक्तिक विकासाला पूरक असणाऱ्या सोयी-सुख सवलतींच्या शोधात असतो. अशा बदलत्या गरजांच्या पूर्ततेसाठी टीव्हीएस ज्युपिटर १२५ हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा आम्हांला आत्मविश्वास आहे. ही स्कूटर या मालिकेतील आधीच्या आवृत्तीशी सुसंगत, जोडीला अतिरिक्त डौल आणि या स्कूटरला अधिक शक्तिशाली बनविणाऱ्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे. आमच्या ग्राहकांना ही स्कूटर नक्कीच परिपूर्णतेचे समाधान देईल.”

टीव्हीएस मोटर कंपनीचे कम्युटर्स, कॉर्पोरेट ब्रँड आणि डीलर ट्रान्सफर्मेशन विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.अनिरुद्ध हल्दर म्हणाले, “टीव्हीएस ज्युपिटर नेहमीच ‘ज्यादा का फायदा’ ता तत्वावर उभी राहिली आहे आणि देशातील सर्वाधिक लाडक्या स्कूटर्सपैकी एक आहे. दळणवळणासाठी भारतीय ग्राहक त्यांच्याकडील पर्यायांची नवकल्पना करत असताना त्यातून आमच्या ग्राहकांना ‘ज्यादा से भी ज्यादा’ असे काही देऊ शकण्याची प्रेरणा आम्हांला मिळाली. या क्षेत्रात, या विभागात प्रथमच सादर होत असलेल्या भरपूर वैशिष्ट्यांसह आम्ही टीव्हीएस ज्युपिटर १२५  सादर करत आहोत. त्यामध्ये दोन मोठ्या आकाराची हेल्मेट्स व्यवस्थित बसू शकेल अशी सीटच्या खाली सर्वात मोठी डिकी, सर्वात लांब सीट, ईटीएफआय आणि इंटेलीगो यांच्यासह नवीन १२५ सीसी इंजिन ही वैशिष्ट्ये आहेत. प्रगतीशील स्टायलिंगमधून स्कूटर ग्राहकांना  प्रीमियमायझेशन वैशिष्ट्याचा अनुभव मिळेल. आमच्या ग्राहकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत. टीव्हीएस ज्युपिटर १२५ स्कूटर टीव्हीएस ज्युपिटरचा महान वारसा पुढे चालू ठेवेल आणि ग्राहकांच्या हृदयातील आपले स्थान जपेल याची आम्हांला खात्री आहे.”

शैली:

टीव्हीएस ज्युपिटर १२५ नव्या, प्रगतीशील स्टाईलिंग, शैलीमध्ये, प्रीमियम लुक देणाऱ्या क्रोम अॅक्सेंट मध्ये येणार आहे. स्कूटरला शैलीदार एलईडी हेडलँप, वैशिष्ट्यपूर्ण पुढचे दिवे, नमुनेदार टेल लँप आणि रेल रिफ्लेक्टर आहे. टीव्हीएस ज्युपिटर १२५ थ्रीडी एम्ब्लेम आणि प्रीमियम पेंट केलेले अंतर्गत पॅनेल्स आहेत. डायमंड कट अॅलॉय व्हिल्स मध्ये डिस्क प्रकार येणार असून त्यामुळे एकूणच स्कूटरचा उठावदारपणा आणखी ठळक होणार आहे.

कामगिरी:

शक्तिशाली एका सिलिंडर, ४ स्ट्रोक, एअर कुल्ड १२४.८ सीसी इंजिन यांवर स्कूटरचा डोलारा असून कमाल शक्ती ६५०० आरपीएमवर ६ किलोवॅट आहे. ४,५०० आरपीएमवर १०.५ एनएम टॉर्क आहे. ही गाडी सरासरी आणि प्रत्यक्षात मिळत असलेले मायलेज दर्शविणारा सेमी डिजिटल स्पीडोमीटरने युक्त आहे. विनाश्रम गाडी चालवण्याचा अनुभव मिळावा यासाठी टीव्हीएस ज्युपिटर १२५ मध्ये बॉडी बॅलन्स तंत्रज्ञान आहे. पुढील टेलिस्कोपिक सस्पेंशनमुळे आरामशीरपणा आणि  मोनोट्यूब कॅनीस्टर गॅस चार्ज्ड शॉक्स सह ३ स्टेप्स एडजस्टेबल मागील सस्पेंशन आहे.

आरामशीरपणा आणि सोय:

चालकाला गाडी चालवताना आराम मिळावा आणि त्याची सोय व्हावी या प्रमुख उद्देशानेच टीव्हीएस ज्युपिटर १२५चे एर्गोनॉमिक्स विकसीत करण्यात आले आहे. दोन मोठ्या आकाराची हेल्मेट्स व्यवस्थित बसू शकेल अशी सीटच्या खाली सर्वात मोठी ३३ लीटर क्षमतेची डिकी यात आहे. या विभागातील गाड्यांमध्ये सर्वात लांब सीट, पाय ठेवायला जास्त जागा आहे. टीव्हीएस ज्युपिटर १२५ नेही टीव्हीएस ज्युपिटरचा वारसा पुढे चालवताना इंधन अर्थकारण खूप छान जपले आहे. इकोथ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानामुळे उत्तम मायलेज अधिक चांगली सुरुवात, शुद्धता आणि टिकाऊपणा मिळणार आहे. टीव्हीएस इंटेलीगो मुळे गाडी चालवण्यातला आराम वाढणार आहे, मायलेज वाढणार आहे आणि वाहतूक सिग्नल किंवा वाहतूक कोंडीच्या वेळी जास्त काळ आयडलिंग होताना इंजिन बंद ठेऊन उत्सर्जन कमी होणार आहे. इतर सुविधांमध्ये साईड स्टँडवर गाडी असल्याचे दाखविणारा इंडिकेटर आणि इंजिन इनहीबीटर, ऑल इन वन लॉक, पुढच्या ग्लोव्ह बॉक्ससह मोबाईल चार्जर सुविधा यांचा समावेश आहे.

७३४०० रूपये या किंमतीला (एक्स शोरुम, दिल्ली) सुरुवात होत असलेली टीव्हीएस ज्युपिटर १२५ ही Drum, Drum Alloy and Disc  प्रकारांत उपलब्ध आहे. ही स्कूटर डॉन ऑरेंज, ईंडीब्ल्यू, प्रिस्टीन व्हाईट, टीटॅनियम ग्रे या रंगांत उपलब्ध होईल. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...