टियूव्ही इंडियाचा जलयुक्त शिवार अभियानास पाठिंबा
पुणे, – सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची घोषणा केली आहे. या प्रकल्पामध्ये खोलीकरण आणि पूल रुंदीकरण, शेतातील तलाव खोदणे यांचा समावेश असणार आहे. त्यासाठी एमआरएसएसीने बनविलेले मोबाईल अॅप वापरले जात आहे. या वेबसाईटद्वारे लोकेशनचे निरिक्षण केले जाऊ शकते. वापरकर्ता हे अॅप डाउनलोड करून छायाचित्राबरोबर लोकेशन पाहू शकतो. जिल्हा, तालुका आणि कामाच्या आकडेवारीनुसार तक्ते आणि ग्राफिक्स उपलब्ध आहेत. या प्रकल्पाद्वारे प्रत्येक वर्षी जवळपास ५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय आहे.
कंपनी कायदा २०१३, परिषिष्ट ७ (क्रं.सहा) नुसार टियूव्ही इंडियाने “पर्यावरण टिकाव आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रकल्पाला मदत करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय बाळगले आहे.
टीयूव्ही इंडियाच्या सीएसआरचा (कॉर्पोरेट सोशल रिस्पाॅन्सिबिलीटी) भाग म्हणून पुण्याजवळील मुळशी हे तालुक्यातील गाव निवडले आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे १० जानेवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पासाठी १ दशलक्ष रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. टीयूव्ही इंडिया नियमितपणे या प्रकल्पाचे निरिक्षण करेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एक प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
व्यवस्थापकीय संचालक मनिष भुपतानी म्हणाले, या प्रकल्पाद्वारे आम्ही सामाजिक सहकार्य आणि जबाबदारी पार पाडत आहोत. यातून ग्रामीण आर्थिक वाढीबरोबरच पर्यावरणीय समतोल राखण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शाश्वत विकास, ऊर्जा आणि पाणी प्रमुख श्री. मनोजकुमार बोरेकर म्हणाले, “पाणी जागतिक अर्थव्यवस्था विकासात महत्वाची भूमिका बजावते . सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि तांत्रिक अशा सर्वच क्षेत्रात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नैसर्गिक संसाधने (नदी, बंधारे, तलाव इत्यादी) संरक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, टीयूव्ही इंडियाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल अभिनंदन करतो. सन २०१९ मध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यात करण्यास मदत होईल. आर्थिक विकास आणि शाश्वत विकास दिशेने हे योगदान नक्कीच उपयुक्त ठरेल.