पुणे- पी एमपीएम एल मधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी खाली हाताने घरी न पाठवता त्यांना ग्रॅज्यूएटी ची रक्कम याच दिवशी देवून निरोप द्यावा ..अशा प्रथेला आज पासून पीएमपीएमएल मध्ये अध्यक्ष – संचालक तुकाराम मुंडे यांनी प्रारंभ केला . सन २०१३ ते जुलै २०१७ या काळातील ग्रॅज्यूएटी ची ३०४ प्रकरणे त्यांनी निकाली काढली .आणि त्यापोटी ९ कोटी ८७ लाख ३३ हजार ५६९ रुपये संबधित कर्मचाऱ्यांना गेल्या २२ ऑगस्ट रोजी अदा केले. आणि आज सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना घरी जाण्यापूर्वी सन्मानाने त्यांची ग्रॅज्यूएटी ची रक्कम देत निरोप दिला .
२०१३ पासून कर्मचाऱ्यांची अडवलेली ग्रॅज्यूएटी ची १० कोटीची रक्कम तुकाराम मुंडेंनी केली अदा … शाब्बास मुंडे …शाब्बास
Date:



