स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाईनगर बस सेवा सुरू

Date:

पुणे – पीएमपीएमएलच्या वतीने क्रमांक 118 स्वारगेट ते वडगाव (वेणूताई कॉलेज) या मार्गाचे विस्तारीकरण करून स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाई नगर अशी बस सेवा आजपासून (दि. 19) सुरू करण्यात आली. या बस सेवेचे उद्घाटन आमदार भिमराव तापकीर व नगरसेवक हरिदास चरवड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सचिन मोरे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे, स्वारगेट डेपो मॅनेजर राजेश कुदळे, असिस्टंट डेपो मॅनेजर विकास मते, स्वारगेट डेपोचे कार्यालय अधीक्षक सुनिल कांबळे यांच्यासह परिसरातील सोसायट्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना आमदार भिमराव तापकीर म्हणाले, ‘चरवड वस्ती परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना ही बस सेवा सुरू झाल्यामुळे किफायतशीर दरात हक्काची प्रवासी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळून पीएमपीएमएल प्रशासनाला या मार्गावर आणखी बसेस वाढवाव्या लागतील.’

नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले, ‘या परिसरातील नागरिकांना पुणे शहरात जाण्यासाठी बसची आवश्यकता होती. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी ही बससेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.’

मार्ग क्रमांक 118 स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाईनगर या बससेवेचा मार्ग स्वारगेट, पर्वती पायथा, विठ्ठलवाडी जकात नाका, विठ्ठलवाडी, आनंद विहार कॉलनी, साईनगर, महादेवनगर, तुकाई नगर, भन्साळी कॅम्पस, सिंहगड कॉलेज पायथा/ वडगाव पोलीस चौकी, सिंहगड कॉलेज गेट, औदुंबर चौक (दत्त मंदिर), ज्ञानोबा चरवड नगर, अजिंक्यतारा सोसायटी असा असणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

टिपू सुलताने 75 हजार हिंदूंची कत्तल केली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

जे लोक देशाच्या विरोधकांना आणि आक्रमणकाऱ्यांना हिरो मानतील, त्यांना...

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...