टीटीए तर्फे “चेंज द वे यु थिंक ” या कार्यशाळेचे आयोजन
पुणे : टाईम्स आणि ट्रेंड अकादमी तर्फे “चेंज द वे यु थिंक ” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . टीटीए च्या फेम हॉल, पुणे येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध प्रशिक्षक, समुपदेशक, आणि प्रेरणादायी स्पीकर सुशीला बहल यांनी हि कार्यशाळा घेतली . त्या स्कील्हान्स ट्रेनिंग आणि मॅनेजमेंट कन्सल्टिंगचे संस्थापक आणि दिग्दर्शक आहेत.
टाईम्स आणि ट्रेंड अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष अमित अग्रवाल म्हणाले, जेव्हा विद्यार्थी कॉर्पोरेट जगतात किंवा स्वतःचे उपक्रम सुरू करतात, तेव्हा त्यांनी योग्य दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.त्यासाठी त्यांनी “चेंज द वे यु थिंक ” या कार्यशाळेचे आयोजन केले .यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या योग्य मानसिकता विध्यार्थी आत्मसात करतील. विद्यार्थ्यांनी त्यांना जे लक्ष्य ठरवले आहे ते साध्य करण्यासाठी वेगळा विचार करायला हवा. त्यासाठी त्यांना कार्यशाळेचा उपयोग होईल
सुशीला बहल यांनी विद्यार्थ्यांना ‘थिअरी ऑफ मार्जिनल गेन्स’ बुद्धिमत्ता सिद्धांत शिकवला. इव्हेंट मॅनेजमेंटची विद्यार्थी श्रुती पाटील, म्हणाली , ” प्रशिक्षकाने आम्हाला प्रत्येक समस्येसाठी किंवा आव्हानाकरिता आउट-द-बॉक्स पद्धतीचा अभ्यास करण्यास शिकवले. समस्येकडे पाहताना आणि ती उत्कृष्टपणे हाताळण्यासाठी विविध पर्याय शोधून पहावे हे हि सांगितले.