गजानन महाराजांचे 30 फूट उंच 18 फुट रूंद पुष्प रांगोळी चित्र ठरले लक्षवेधक

Date:

unnamed1

शिवतीर्थनगर पौडरोड येथील श्री गणेश मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा

पुणे :
           शिवतीर्थ नगर, पौडरोड येथील श्री गणेश मंदिरामध्ये आज सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. गेली 16 वर्षे या उपक्रमाचे मंदीरात आयोजन केले जाते. त्रिपूरारी पोर्णिमेनिमित्त श्रीकांत गोरे (वय 76) यांनी काढलेल्या गजानन महाराजांचे 30 फूट उंच 18 फुट रूंद पुष्प रांगोळी चित्राभोवती पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
      या उपक्रमास शशिकांत सुतार, उत्सव प्रमुख पृथ्वीराज सुतार यांचे सहकार्य लाभले. यावेळी व्यवस्थापक आनंदा अंबरडेकर, मधुकर शिंदे, आनंद फडके, ओमकार गहुले, मिलिंद आंब्रे सहभागी झाले होते.
    संस्थापक माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी 26 वर्षांपुर्वी खासदार निधीतून बांधलेल्या या श्री गणेश मंदिरामध्ये अनेक धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. पेशाने इंजिनिअर असलेले श्रीकांत गोरे (वय 76) समाजकार्याची आवड म्हणून पौड रोड येथे गेली 15 वर्षे विद्यार्थ्यांना चित्रकलेचे मोफत प्रशिक्षण देत आहेत.
         दरवर्षी श्रीकांत गोरे संत, देव देवता यांची चित्रे काढतात. यंदाच्या वर्षी त्यांनी श्री गजानन महाराज ( शेगाव) यांची पुष्प रांगोळी काढली.  ही रांगोळी अतिशय लक्षवेधक होती. महिला , नागरिक मोठ्या संख्येने या दीपोत्सवात सहभागी झाले होते.
———————————————————————
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...