प्रबोधनाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या मंगेश तेंडुलकर यांना विसरता येणार नाही :खा . वंदना चव्हाण
पुणे :
‘ ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांच्या निधनाने पुणे शहराच्या सांस्कृतिक ,सामाजिक विश्वात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे . आपल्या व्यंगचित्रातून परखड आणि मार्मिक भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार काळाच्या पडद्याआड गेले . नागरी प्रश्नांवर भाष्य करून न थांबता रस्त्यावर उतरून त्यांनी सतत प्रबोधनाची भूमिका घेतली हे त्यांचे योगदान पुणेकरांना विसरता येणार नाही . ‘ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष खा . वंदना चव्हाण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे .
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खा . एड . वंदना चव्हाण यांनी मंगेश तेंडुलकर यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत