Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मानधन तत्वावर अनुवादकांनी अर्ज करावेत; भाषा संचालनालयाकडून आवाहन

Date:

मुंबई, दि. 8 ; प्रशासकीय कायदे विषय शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून मराठी भाषा विभागाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

इच्छुक अनुवादकांनी आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छाया प्रतीसह भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत ५ वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ या पत्त्यावर दि. १०.१२.२०२२ पर्यंत पाठवावेत. असे भाषा संचालक, मराठी भाषा यांनी कळविले आहे.

कोण अर्ज करु शकेल?

  • अनुवादकास प्रशासकीय कायदेविषयक, वैद्यकीय महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी पर्यावरण, संगणक तंत्रज्ञान यापैकी एक किंवा त्याहून अधिक विषयांचा अनुवाद करण्याचा अनुभव असावा.
  • अनुवादकास मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • ज्या व्यक्तींनी उपरोक्त एक किंवा अनेक विषयांमध्ये स्वतः अनुवाद करून पुस्तके प्रकाशित केली आहेत अशा व्यक्ती देखील अर्ज करू शकतात.
  • अनुवादकास पुरेसे संगणक ज्ञान आवश्यक आहे. अनुवाकाकडे इंटरनेटसह संगणकाची सुविधा असावी,
  • मराठी/इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी/पदवी/अनुवाद पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात.

कामाचे स्वरुप तसेच अटी व शर्ती

  • नामिकेतील तज्ज्ञ अनुवादकांना अनुवादांची कामे शासनाच्या विविध विभाग, मंडळे. महामंडळे यांच्याकडून परस्पर पाठविण्यात येतील तसेच संबंधित विभाग व कार्यालय आणि तज्ज्ञ अनुवादक यांच्यामध्ये ठरविण्यात येईल अशा कालावधीत ही कामे नामिकेतील अनुवादकांना विहित मुदतीत पूर्ण करून द्यावी लागतील.
  • नामिकेतील अनुवादकांना शासन वेळोवेळी निश्चित करील त्या मानधन दरानुसार मानधन अनुज्ञेय राहील.
  • अनुवादकाने अनुवादित केलेल्या अनुवादाच्या अचुकतेची जबाबदारी सर्वस्वी संबंधित अनुवादकाची राहील.
  • अनुवादकांनी त्याच्या कामाचा सहामाही अहवाल विहित नमुन्यात या कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक राहील,
  • नामिकेतील तज्ज्ञांना त्यांची अचूकता कार्यक्षमता व कार्यतत्परता विचारात घेऊन वगळण्याचा तसेच नामिकेत नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्याचा अधिकार या कार्यालयाचा राहील.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...