पुणे, महानगरातील व्यग्र आणि धवपळीच्या जीवनशैलीत आरोग्यदायी , ताजे व सकस खाद्यपदार्थ खायला मिळणे एक अवघड बाब बनली आहे. परंतु गेल्या सहा वर्षात टॉर्प इट अप या क्विक सव्हिस रेस्टारंट( क्यूएसआर) ब्रॉंड ने अतिशय किफायतशीर आणि स्पधात्मक किमतीत असे आरोग्यदायी आणि ताजे खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचवून एक आदर्श निर्माण केला आहे. एसजीएम एंटरप्राईजेस च्या टॉर्प इट अप या लोकप्रिय क्यूएसआर ब्रॅंड ने अवघ्या सहा वर्षात मुंबई व पुण्यात तब्बल 21 दालने सुरू करुन अतिशय लक्षणिय व्यवसाय विस्तार केला असून आता ते पुण्यातील दुसऱ्या टप्यातील विस्तारीकरणासाठी सज्ज झाले आहेत. या बाबतची माहिती टॉर्प इट अपचे संचालक प्रतीक मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टॉर्प इट अप ‘ने भारतातील सर्वाधिक लोकप्रिय क्यूएसआर ब्रॅंड मध्ये अल्पावधीत मानाचे स्थान मिळविले आहे. ताजे आणि नावीन्यपूर्ण सॉंडविचेस, टॉर्पोडोज, क्रोसंट्स, सॅलड्स याचबरोबर असंख्य प्रकारचे साईड्स, बेव्हरेजेस. टाटिन्स, कॉम्बो मिल्स आणि डेझर्टस यांच्या माध्यमातून टॉर्प इट अपने २००९ मध्ये आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या विश्वाचा नूरच पालटवून टाकला, या वर्षाच्या प्रारंभी त्यांनी सादर केलेल्या नव्या खाद्यपदार्थांना सर्वच ग्राहकांनी पसंती दिली आणि टॉर्प इट अपच्या नावावर पसंतीची मोहोर उमटविली. पुण्यात आधीपासूनच टॉर्प ईट अप ची सात दालने असून मित्तल यांनी ब्राॉंडचा शहरात आणखी महत्वकांक्षी विस्तार करण्याती घोषणा केली. आरोग्यदायी खाद्यपदार्थांना भारतीयांची मिळणारी पसंती लक्षात घेउ ‘टॉर्प इट अप’ चा नव्या भागात टप्याटप्याने विस्तार केला जानार आहे.
मुंबई आणि पुण्यात भक्कम पाया रचल्यानंतर ‘टॉर्प इट अप’आता लवकरच इतर शहरांमध्ये विस्तार करण्यात येईल.