मुंबई: जमिनींच्या खरेदी व्यवहारांचे दाखले देत नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलिक यांनी आज सडेतोड उत्तर दिलं. ‘फडणवीस हे बॉम्ब फोडण्याची भाषा करून खोट्या आरोपांचे अवडंबर माजवत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं असा कोणाचाही कोणाशी संबंध जोडायचा झाला तर सनातन संस्थेचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असंही म्हणावं लागेल,’ असं मलिक यांनी सुनावलं.उद्या सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवलं होतं, त्याविषयी मी माहिती देईन.
देवेंद्र फडणवीसांचे फटाके भिजलेले आहे. त्यांना माहिती पुरविणारा खेळाडू कच्चा आहे. माझ्यावर असे गंभीर आरोप कधीच झाले नाही. मात्र फडणवीसांनी अंडरवर्ल्डचा खेळ सुरूच केला आहे तर तो आम्ही पूर्ण करू. तसेच उद्या सकाळी दहा वाजता फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले नाते उघड करणार तसेच उद्या सकाळी दहा वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या मदतीने राज्य वेठीला धरले होते. फडणवीसांचे अंडरवल्डशी संबध असल्याचा खुलासा उद्या करणार असून उद्या मुंबईत अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार, फक्त 10 वाजेपर्यंत थांबा असे नवाब मलिक म्हणाले आहे.दाऊद कासकरचं कोकणातलं घर सनातन संस्थेनं घेतलंय. मग सनातनचा दाऊदशी किंवा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असं म्हणायचं का?,’ असा खडा सवाल नवाब मलिक यांनी फडणवीसांना केला.

