शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजचे भाषण फक्त दिखाऊ-प्रविण दरेकर

Date:

मुंबई, दि. १९ जुन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकाबाजुला तीन पक्षांबरोबवर सत्ता चालवायची आहे तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाची भूमिका सुद्धा अधोरेखित करायची आहे, तुम्ही स्वबळाचे नारे दिले मी स्वबळावर तयार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आज मुख्यमंत्र्यांकडून झाला, परंतु स्वबळावर महाराष्ट्रात सरकार आणणं शक्य नाही म्हणून समंजसपणे आपल्याला एकत्रित लढावे लागेल अशाप्रकारचा दिखाऊपणाचा संदेश मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून दिल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
शिवसेनेच्या आज ५५ व्या वर्धापनदिना निम्मित शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव म्हणून सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की,पक्षप्रमुख म्हणून भाषण केले असले तरी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशा प्रकारच्या दोन्ही भूमिका भाषणातून दाखविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी आज केला. एकाबाजुला दादर येथील राडाचे पक्षप्रमुख म्हणून करत असताना दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री म्हणून कामालाही प्राधान्य दिलं त्यामुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशा प्रकारच्या दोन्ही भूमिका संतुलित म्हणून मांडण्याचा प्रयत्न झाला.मुख्यमंत्री पदाचं कवच असल्याची जाणीव भाषणामध्ये अधून मधून मुख्यमंत्र्यांना होत असल्याची खोचक टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.

घरबाहेर पडणार, बाकीचे आमचं भाग्य ..
संकटाच्या काळामध्ये फील्डवर न जाता घरातून नियंत्रण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. घरात बसून एवढे काम होत नसेल म्हणून मी घराबाहेर पडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले त्यामुळे आज महाराष्ट्रातील जनतेचं भाग्य आहे. आता मोठ्या प्रमाणावर काम होतील, ते घराबाहेर पडणार आहे, याचं मी स्वागत करतो. असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून निष्काळजीपणा

कोरोना संकट काळात नियमांच्या पायमल्लीमुळे लोकं आज गुदमरली जात आहे. “सर्वसामान्य जनतेने लोकलबाबत विचारलं तर तुम्हाला वाट पाहवी लागेल, शक्य नाही, असं सांगितलं जातं. सर्वसामान्य माणूस तुमचं सरकार म्हणून ऐकतो, संकट आहे म्हणून ऐकतो. तुम्ही सर्वसामान्यांना दम देणार, इशारे देणार, कायद्याचे बंधनांचा धाक दाखवतात. पण तुमच्याकडून असं कृत्य होत असेल तर लोकांनी तुमचं का ऐकावं? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळाली. हजारोच्या संख्येने गर्दी झाली असून कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला. हे दुर्देवी असं चित्र आहे. विशेष म्हणजे राज्यात कोरोनाची साथ आल्यापासून नियमांचं पालन करण्यात सर्वात दक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडं पाहिलं जातं कठोर प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या असताना आज सकाळीचं अजित पवार यांनी पुण्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली, त्यांनी कडक इशारा देतो, असं म्हटलं होतं, त्यामुळे आता या कार्यक्रमावर राज्य सरकार कुठली कारवाई करणार? असा सवालही दरेकर यांनी यावेळी केला.

हिंदुत्व आमचा श्वास आहे हे आजच्या भाषणाचे प्रमुख वैशिष्ट्य

कुठलाही पेटंट नसताना बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता पेटवली, मराठी माणसाच्या हितासाठी काम केलं त्यामुळे मराठी माणसाचं पक्ष असे चित्र उभारले गेले. त्यामुळे मराठी माणसाचं पेटंट फक्त तुमच्याकडे आहे का ? जो ज्याच्यासाठी करतो ते घटक त्या पक्षाला नेतृत्व देत असते देशभरात भाजप हिंदुत्वासाठी लढत आहे. जी भूमिका काल हिंदुत्वासाठी मांडली गेली तीच आज आहे त्यामुळे पेटंटची आवश्यकता आम्हाला नाही. उलटपक्षी कधीकाळी बाळासाहेब ठाकरे यांना आदर दिला होता त्यामुळे ही पदं, आदर ठरवून होत नसतात, पेटंट ठरवून होत नसतं. प्रत्येकाच्या भूमिकेवर विचारधारा ठरत असते. प्रत्येक पक्ष विचारधारेवर उभा असतो. सत्ता सर्वांना हवी असते. परंतु सत्तेसाठी आपली विचारधारा पातळ होत असेल तर दुर्दैवी आहे. महाविकास आघाडी सरकार मध्ये असलो तरी हिंदुत्वासोबत ठाम आहोत यांचा पुनरुच्चार करावा लागला, हिंदुत्व आमचा श्वास आहे हे आजच्या भासनातून प्रमुख वैशिष्ट्य आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...