आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद;पोलिसांनी बंद ला मदत केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Date:

मुंबई-लखीमपूर खेरीमधील हिंसाचाराचा विरोध म्हणून महाविकास आघाडी सरकारने आज बंद पुकारलेला आहे. या महाराष्ट्र बंदवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकार ढोंगीपणा करते आहे. लखीमपूरसाठी बंद आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत नाही.’ असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.या शिवाय पोलिसांनी या बंद ला मदत केल्याचा आरोप हि त्यांनी केला .

राज्य सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे. असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर या सरकारने आज संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे. अन्यथा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लखीमपूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही.आज शेतकरी हे संकटामध्ये आहे. तसेच हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, मात्र त्यांच्या सर्व घोषणा या हवेतच विरल्या आहेत. अनेक संकटांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही आणि जी केली असेल तरी ते अपुरी मदत आहे. यामुळे भाजपचे सरकारच बरे होते असेही लोक म्हणत आहेत.

मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. बंद करणारी ही तीच मंडळी आहे की ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना अशा प्रकारचे आंदोलन करायची नैतिकता तरी आहे का? असा सवालही फडणवीसांनी केला आहे. तसेच लखीमपूरची घटना गंभीर आहे. तेथील सरकार यावर कारवाई करत आहे. मात्र आजचा बंद हा तेथील घटनेविषयी संवेदना दाखवण्यासाठी नाही, तर त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का अशा संकुचित राजकीय विचारने केलेला आहे’ असे म्हणत फडणीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची...

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...