आज पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 92 हजार 286

Date:

पुणे विभागातील 14 लाख 18 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 15 लाख 41 हजार 97 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 29 : पुणे विभागातील 14 लाख 18 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 41 हजार 97 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 92 हजार 286 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 30 हजार 193 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.98 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.03 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 8 हजार 170 रुग्णांपैकी 9 लाख 60 हजार 18 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 31 हजार 542 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.22 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 60 हजार 554 रुग्णांपैकी 1 लाख 33 हजार 115 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 386 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 49 हजार 565 रुग्णांपैकी 1 लाख 36 हजार 768 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 893 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 904 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 15 हजार 436 रुग्णांपैकी 99 हजार 384 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 715 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 337 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 7 हजार 372 रुग्णांपैकी 89 हजार 27 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 750 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 595 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 9 हजार 244 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 524, सातारा जिल्ह्यात 2 हजार 528, सोलापूर जिल्ह्यात 843, सांगली जिल्ह्यात 1 हजार 218 तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 131 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 9 हजार 395 आहे. पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 161, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 124, सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 68, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 256 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 786 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 26 लाख 23 हजार 837, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 25 हजार 6, सोलापूर जिल्हयामध्ये 5 लाख 37 हजार 145, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 93 हजार 251 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 55 हजार 877 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 85 लाख 94 हजार 951 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 15 लाख 41 हजार 97 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 28 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय?:रात्री उशिरा आमदारांची सुनेत्रा पवारांशी खलबतं; राष्ट्रवादीत हालचालींना वेग

मुंबई-राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर या...

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...