पुणे विभागातील 14 लाख 78 हजार 273 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी: विभागात कोरोना बाधित 15 लाख 82 हजार 238 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 04 : पुणे विभागातील 14 लाख 78 हजार 273 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 82 हजार 238 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 72 हजार 382 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 31 हजार 583 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.00 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.43 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 19 हजार 28 रुग्णांपैकी 9 लाख 79 हजार 840 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 22 हजार 238 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.15 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 70 हजार 845 रुग्णांपैकी 1 लाख 49 हजार 47 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 542 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 256 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 53 हजार 307 रुग्णांपैकी 1 लाख 44 हजार 512 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 746 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 21 हजार 282 रुग्णांपैकी 1 लाख 6 हजार 846 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 929आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 507 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 17 हजार 776 रुग्णांपैकी 98 हजार 28 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 927 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 821 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 6 हजार 568 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 864, सातारा जिल्ह्यात 1 हजार 531, सोलापूर जिल्ह्यात 556, सांगली जिल्ह्यात 1 हजार 13 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 604 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 12 हजार 120 आहे. पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 5, सातारा जिल्हयामध्ये 5 हजार 836, सोलापूर जिल्हयामध् 996 , सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 64 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 219 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 89 लाख 38 हजार 490 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 15 लाख 82 हजार 238 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
पुणे विभागातील लसीकरण
आजपर्यंत पुणे जिल्हयात 27 लाख 77 हजार 247, सातारा जिल्हयात 7 लाख 43 हजार 166, सोलापूर जिल्हयात 5 लाख 67 हजार 117, सांगली जिल्हयात 7 लाख 6 हजार 165 व कोल्हापूर जिल्हयात 1 लाख 16 हजार 821 इतक्या नागरिकांचे लसिकरण झालेले आहे.
(टिप :- दि. 3 जून 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

