पुणे विभागातील 16 लाख 80 हजार 609 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 17 लाख 63 हजार 354 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 11 : पुणे विभागातील 16 लाख 80 हजार 609 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 63 हजार 354 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 46 हजार 151 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 36 हजार 594 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.31 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 62 हजार 995 रुग्णांपैकी 10 लाख 34 हजार 245 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 762 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.30 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 2 हजार 426 रुग्णांपैकी 1 लाख 88 हजार 120 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 418 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 888 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 67 हजार 216 रुग्णांपैकी 1 लाख 60 हजार 147 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 630 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 439 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 56 हजार 53 रुग्णांपैकी 1 लाख 41 हजार 793 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 10 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 74 हजार 664 रुग्णांपैकी 1 लाख 56 हजार 304 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 331 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 136 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 114, सातारा जिल्ह्यात 766, सोलापूर जिल्ह्यात 371, सांगली जिल्ह्यात 1 हजार 271 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 614 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 230 आहे. पुणे जिल्हयामध्ये 812, सातारा जिल्हयामध्ये 995, सोलापूर जिल्हयामध्ये 430, सांगली जिल्हयामध्ये 955 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 2 हजार 38 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 13 लाख 88 हजार 216 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 63 हजार 354 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 10 जूलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)