दलित पँथरतर्फे शशिकांत कांबळे यांना’डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’

Date:

पुणे : दलित पँथरतर्फे दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांना प्रदान करण्यात आला. आंबेडकर संघर्ष समितीच्या माध्यमातून शशिकांत कांबळे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडघम, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, माधव अभ्यंकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शशिकांत कांबळे यांचा नेहमी पुढाकार असतो, अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, यापुढे जबाबदारीही वाढली असल्याचे  कांबळे यांनी नमूद केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या हातातील घड्याळ गणेश शिंदे यांच्या हाती बांधून केला सन्मान

कोथरूडमध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात; गणेश शिंदे यांच्या भाषणाने...

१५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला एकमताने मान्यता,विरोध भाषणात पण लेखी उपसूचना एकाकडूनही नाही

पुणे _महापालिकेतील स्थायी समितीने मुख्य सभेला सादर केलेल्या १५...

घरगुती करदात्यांसाठी शास्ती कर २% वरून १% करावा:नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी,...