ऑक्सिजन प्लांट हाताळणारे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Date:

पुणे दि. 26:- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जिल्हयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. मागील कोरोना लाटेचा अनुभव विचारात घेत येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही, यासाठीचे आवश्यक ते नियोजन करण्यासोबतच ऑक्सिजन प्लांटसंबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करुन प्रशिक्षित मनुष्यबळ तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या संबंधित वैद्यकीय अधिक्षक व औषध निर्माण अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी उपसंचालक तथा कोविड समन्वयक डॉ. नितिन बिलोरीकर, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेंडगे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हयातील वैद्यकीय अधिक्षक व औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनअभावी विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जिल्हयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. या ऑक्सिजन प्लांटसाठी प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी यांची टिम तयार करण्याचे काम सूरु आहे. ऑक्सिजन प्लांटबाबत राज्यशासन व टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचे पालन करुन दिड वर्षात कोविड संबंधीत अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मागील कोरोना लाटेचा अनुभव विचारात घेत येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहाणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...