इंटरनॅशनल टायगर्स डेच्या निमित्ताने वेस्टएंड टायगर ट्रेल फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन
पुणे,- इंटरनॅशनल टायगर्स डेच्या निमित्ताने शुक्रवार २८ जुलै ते ३० जुलै दरम्यान वेस्टएंड मॉल आणि जर्नीज यांच्या संयुक्त विद्यमाने वेस्टएंड टायगर ट्रेल ह्या 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. औंधच्या वेस्टएंड मॉल मध्ये दुपारी १२ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.
सेव्ह टायगर्स मोहिमेला समर्थन देत देशात वाघांनविषयी जागरूकता निर्माण करणे, टायगर टूरिझमला चालना देणे, वाघांचे रक्षण आणि ह्या प्रजातीच्या संवर्धनासाठी कार्यरत संस्थानांना आर्थिक साहाय्य करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्येश्य आहे.
ह्या कार्यक्रमात तीन दिवसीय टायगर फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले गेले आहे, ज्यामध्ये वाघांचे खास फोटो काढणार्या देशभरातील व्यवसायिक आणि हौशी फोटोग्राफर्सना निमंत्रित केले आहे.
विजेत्यांना पुसस्कार व प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात येईल. फोटोग्राफर्सनी काढलेले फोटो प्रदर्शनातं विक्रीसाठी ठेवले जातील व यातून मिळणारे उत्पन्न पन्ना टायगर रिझर्व्हला डोनेट करण्यात येईल.
लहान मुलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. त्यांना २९ जुलै, २०१७ रोजी वाघ चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. ह्यात मुलांना त्यांची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.