भाजपच्याअंदाजपत्रकात घोषणांचा गडगडाट

Date:

पुणे – नुसताच त्याच त्याच घोषणांचा गडगडाट असलेले अंदाजपत्रक भाजपने महापालिकेत मांडले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

महापालिकेत गेली चार वर्षे भाजपची सत्ता आहे. चार वर्षांत कोणतीही चमकदार कामगिरी भाजपला करता आलेली नाही. आता वर्षभराने निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने पोकळ आश्‍वासने, घोषणा यांचा वर्षाव सुरू आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी मांडलेले 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक त्याचाच नमुना आहे.

गेल्या तीन वर्षांत अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दीष्ट भाजपला गाठता आलेले नाही. ही वस्तुस्थिती असताना यंदा अंदाजपत्रक फुगवून 8 हजार कोटीहून अधिक रकमेचे मांडून पुणेकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आहे, पण सुज्ञ पुणेकरांनी भाजपची चलाखी ओळखली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

नोटबंदीपासून बांधकाम व्यवसाय मंदित सापडला. त्याचा परिणाम शहराच्या आर्थिक उलाढालींवर झाला. तेव्हापासून महापालिकाही आर्थिक पेचात सापडत गेली आणि आर्थिक गाडा अधिक रुतत गेला आहे.

पुणे महापालिकेने उत्पन्नवाढीचे ठोस प्रयत्न चार वर्षांत केले नाहीत. त्यामुळे करोना संकटाला महापालिका आर्थिकदृष्ट्या तोंड देऊ शकली नाही. उत्पन्नवाढीचा निश्‍चित कार्यक्रम नाही, तिजोरीत खडखडाट आहे आणि कधीही पूर्ण होऊ करणार नाहीत अशा घोषणांचा गडगडाट भाजपच्याअंदाजपत्रकात आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...