पुणे – कोवीड प्रतिबंधक लस टोचण्यासाठी खडकीत तीन केंद्र सुरु करावीत अशी मागणी आमदार शिरोळे यांनी जिल्हाधिकाऱी राजेश देशमुख यांच्याकडे आज (गुरुवारी) केली.
खडकीमध्ये सध्या एकच लसीकरण केंद्र उपलब्ध असल्याने लसीकरणाला वेग येत नाही. नागरिकांची गैरसोय होते असे आमदार शिरोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले. साप्रस पूर्व येथील खडकी छावणी परिषदेचे स्व.बळिराम सावंत प्राथमिक उप आरोग्य केंद्र, रेंजहिल जीवनप्रकाश हेल्थ क्लब येथील प्राथमिक उप आरोग्य केंद्र आणि खडकी बाजार येथील खडकी छावणी परिषदेचे श्रीराम मंगल कार्यालय अशा तीन ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु करावीत अशा मागणीचे पत्र आमदार शिरोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कोवीडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील पूर्व तयारी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल येथे बालरुग्णांसाठी सर्व सुविधायुक्त ३० बेड्सचा बालरुग्ण विभाग सुरु करावा. शासनामार्फत बालरोगतज्ज्ञांची तिथे नेमणूक करावी अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
यावेळी खडकी छावणी परिषदेचे नगरसेवक अभय सावंत, नगरसेविका कार्तिकीताई हिवरकर, खडकी भाजपा अध्यक्ष धर्मेशजी शहा, उपस्थित होते.

