गोव्यात प्रत्येक घरातून एकाला नोकरी-नोकरी मिळत नाही, तोपर्यंत दरमहा तीन हजार रुपये- अरविंद केजरीवालांची घोषणा

Date:

पणजी- आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वीच उत्तराखंडमध्ये बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला होता. आता केजरीवाल यांनी गोव्यातील सरकारवर हल्लाबोल केला. येथे लाच दिल्याशिवाय सरकारी नोकरी मिळत नसल्याचा दावा करताना त्यांनी गोव्यात मोठी घोषणा केली.

केजरीवाल यांनी म्हटले की, आम आदमी पक्षाचे गोव्यात सरकार बनताच प्रत्येक घरातून एका युवकाला नोकरी देण्यात येईल. गोव्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीत 80 टक्के कोटा आरक्षित करण्यात येईल. तसेच युवकांना नोकरी मिळत नाही, तोपर्यंत दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील.

नोकरी आणि तरुणांव्यतिरिक्त केजरीवाल यांनी पर्यटन आणि खाणींशी संबंधित कुटुंबांना बेरोजगारी भत्ता देण्यासंदर्भात वचन दिले आहे. ते म्हणाले की, गोव्यात अनेक कुटुंब पर्यटन निगडीत व्यवसायातून उदरनिर्वाह करतात. करोनामुळे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. अशा कुटुंबांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आम आदमी पक्ष प्रत्येकी पाच हजार रुपये दर महिन्याला देईल. हीच मदत मायनिंग पुन्हा सुरू होईपर्यंत मायनिंगचे काम करणाऱ्या कुटुंबाला देऊ.

या व्यतिरिक्त दिल्लीच्या धर्तीवर गोव्यात तरुणांसाठी स्कील युनिव्हर्सिटी उभारण्यात येईल. जेणेकरून कौशल्य विकास होईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गोव्यामध्ये केजरीवालांची लोकप्रियता वाढल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...