वाॅशिंगटन. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये मीडिया ब्रीफिंगदरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) चे फंडिंग थांबवण्याची धमकी दिली. कोरोना व्हायरस महामारीदरम्यान त्यांनी आरोप केला आहे की, डब्ल्यूएचओ चीन केंद्रित आहे. ते मदत तर आमच्याकडून घेतात, पण आम्ही लावलेल्या प्रवासाच्या प्रतिबंधांवर असहमती दर्शवतात. ते अनेक गोष्टींविषयी चूक होते. त्यामुळे डब्ल्यूएचओवर खर्च खर्च होणारे फंडिंग थांबवणार आहेत.
मात्र एकाच मिनिटानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली. ट्रम्प यांनी मार्चमध्येही दावा केला होता की, कोरोनावर चीनबद्दल डब्ल्यूएचओचे वर्तन पक्षपाती आहे. त्यामुळे अनेक लोकांना चांगले वाटत नाहीये.
डब्ल्यूएचओने जानेवारीमध्ये चीनला प्रवासावर प्रतिबंध न लावण्यास सांगितले होते….
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेससने 23 जानेवारीला जेनेवामध्ये कोरोनाबद्दल एक आपत्कालीन बैठकीत म्हणाले होते की, आम्ही प्रवास आणि व्यापारावर व्यापक प्रतिबंधाची शिफारस केली नाही, पण एअरपोर्ट्सवर प्रवाश्यांचे स्क्रीनिंग नक्कीच व्हायला हवे. तेव्हा चीनमध्ये केवळ 600 केस समोर आल्या होत्या आणि 17 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर कोरोना व्हायरस अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापुर, थायलँड आणि सऊदी अरबमध्ये पसरला होता. मात्र 2 फेब्रुवारीला अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या प्रवाश्यांवर प्रतिबंध लावला होता आणि चीनमधून आलेल्या अमेरिकी नागरिकामासाठी 14 दिवसांचे क्वारंटाईन अनिवार्य केले होते.
अमेरिकेमध्ये कोरोनाने 12 हजारपेक्षा जास्त मृत्यू…
जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 82 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 14 लाख लोक संक्रमित आहेत. जॉन हॉपकिंस यूनिव्हर्सिटीनुसार, अमेरिकेमध्ये 24 तासांत सुमारे दोन हजार लोकांनी प्राण सोडले. येथे आतापर्यंत 12 हजार 841 लोकांनीं आपला जीव गमावला आहे. तसेच न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि कनेक्टिकटमध्ये एका दिवसात 1,024 लोकांचा मृत्यू झाला आहे.


