पुणे-पुण्यातील कामगारांची सुरक्षा आणि हक्क यांना शास्कीत स्तरावरूनच तिलांजली देण्यात आली असून हडपसर परिसरात उरळी देवाची, फुरसुंगी आणि मंतरवाडी येथे नव्याने विकसित झालेल्या कपड्यांच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये कामगार कायद्यांची किमान अंमलबजावणीही होत नसल्याची माहिती तमाम लोकांना ज्ञात आहे. तसेच, कामगारांच्या सुरक्षेसाठीही आवश्यक पावले उचलण्याच आलेली नसल्याने परिस्थिती अपघातप्रवण बनली असून, त्यामुळे सुमारे १५० दुकानातील पाच ते सहा हजार कामगार अपघातांच्या तोंडावर उभे असल्याचा निष्कर्ष अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने काढला आहे. आपल्या कर्तव्य बजावण्याऐवजी कामगार उपायुक्त आणि सुरक्षा संचालक कार्यालय मात्र आपल्याच तंद्रीत मश्गुल असल्याचे वार्षाणु वर्षे दिसून येते आहे .
हडपसर-सासवड रस्त्यावर उरळी देवाची या ठिकाणी राजयोग कापड दुकानाला आग लागली. त्या वेळी दुकानाला बाहेरून कुलूप असल्याने आत झोपलेल्या पाच तरुण कामगारांचा त्यात मृत्यू झाला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी (१० मे) अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली.
या ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या दुकाने आणि गोदामांच्या रचनेची त्यांनी पाहणी केली. दुकानांमधील कामकाजाची पद्धत, कामगारांच्या कामाची माहिती घेतली. तसेच, दुकानांमध्ये काम करणारे कामगार, मालक, उरळी देवाची गावातील विविध क्षेत्रातील नागरिक यांच्याशी चर्चा केली. दुकानांमध्ये कामगार कायद्यांची किमान अंमलबजावणीही होत नसल्याचे दिसून आले.
कामगारांना आठवड्याची पगारी सुट्टी, आठ तासाचे काम, त्यावरच्या कामाचा जादा मोबादला, नियमानुसार किमान वेतन, विमा, आजारपणात उपचाराची व्यवस्था, भविष्य निर्वाह निधी इत्यादी सामाजिक सुरक्षेची अमलबजावणी करावी, तसेच अपघात पुन्हा होण्याची श्यक्यता निकालात काढावी, अशी मागणी करणारे निवेदन पुणे जिल्ह्याचे कामगार उपयुक्त विकास पनवेलकर यांना समितीने दिले. कामगार नुकसान भरपाई कायद्यानुसार अपघातात मृत कामगारांच्या वारसांना भरपाई मिळावी. नुकसान भरपाईच्या निश्चितीसाठी अपघाताची माहिती कामगार अपघात नुकसान भरपाई आयुक्त तथा कामगार न्यायधीश यांच्याकडे पाठवावी अशीही मागणी शिष्टमंडळाने या वेळी केली.
समितीचे निमंत्रक नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात ‘लोकभारती’चे प्रमोद दिवेकर, राकेश नेवासकर, प्रीतम ओस्वाल याचा समावेश होता. या विषयी प्रशासन गंभीर असून, येत्या आठवड्यातच सर्व व्यापाऱ्यांची आपण बैठक घेणार आहे. त्यांनी कामगारांना द्यावयाच्या सोयी सवलती, हक्क इ. बाबत त्यांना सूचना दिल्या जातील. त्याचे पालन न झाल्यास कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असे पनवेलकर या वेळी म्हणाल्याचे समितीने कळविले आहे.