पुणे–कर्जवसुली प्राधिकरण पुणे अर्थात डी आर टी या न्यायालयात राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज वसूली संबंधित हजारो कोटी रुपयांचे वसुलीचे दावे प्रलंबित असून या न्यायालयात पुणे सहित इतर सात जिल्ह्याचे कार्यक्षेत्र दिलेले आहे. या न्यायालयाच्या इमारतीमध्ये वसुली दाव्यांच्या प्रकरणांच्या फाईलींची अतिशय दुरावस्था झाली असून आज दिनांक 4 नोव्हेंबर बुधवार रोजी पुणे डीआरटी बार असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्ज वसुली प्रकरणांच्या मूळ कागदपत्रे वाळवी आणि मुंग्या लागून नष्ट झाली हि बाब कर्जवसुली प्राधिकरणाच्या प्रबंधक यांच्या नजरेस आनून दिली आणि अशाप्रकारे कर्जवसुली दाव्यांमध्ये गंभीर अडचण निर्माण होऊ शकते आणि हा जनतेचा पैसा वसूल न झाल्यास राष्ट्रीय नुकसान होऊ शकते. इतकी गंभीर परिस्थिती असून सुद्धा कर्जवसुली प्राधिकरण न्यायालय अन्य चांगल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करावे अशी मागणी पुणे डिआरटी बार असोसिएशनने वारंवार केंद्र शासनाकडे केलेली आहे. परंतु आजतागायत याची गंभीर दखल न घेतल्यामुळे कागदपत्रे नष्ट होण्याची परिस्थिती ओढवलेली आहे.असा दावा पुणे डीआरटी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅॅड.विजय चांडवले,तसेच योगेश हिरवे आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
त्यांनी असे म्हटले आहे कि,’ बार असोसिएशन यांच्यातर्फे केंद्र शासनास वारंवार विनंती करण्यात आली आहे की कर्जवसुली प्राधिकरणाची इमारत पुणे शहरातील शहरातील चांगल्या सुविधा असलेल्या इतर इमारतीमध्ये तात्काळ स्थलांतरित करावी वसुलीचे दावे हे तात्काळ निकाली काढावेत तसेच व राष्ट्रीय नुकसान वाचेल अशी आमची मागणी आहे तसेच या न्यायालयात गेल्या एक वर्षापासून न्यायाधीशाचे पद रिक्त असून तात्पुरता पदभार हैदराबाद येथे आहे व त्यामुळे हजारो कोटी रुपयांचे वसुलीचे दावे हे प्रलंबित पडलेले असून वसुलीची कार्यवाही ठप्प झालेली आहे तरी पुणे डिआरटी बार असोसिएशनची अशी आग्रहाची मागणी आहे कि राष्ट्रीय हितासाठी व शासनाच्या पैशाच्या वसुलीसाठी तात्काळ कर्जवसुली प्राधिकरण पुणे येथे प्राधिकृत अधिकारी तथा न्यायाधीश यांची नेमणूक करावी व कर्ज वसुली प्रकरणांना न्याय देऊन राष्ट्रीय हिताचे रक्षण करावे.असेही पुणे डीआरटी बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

