पुणे दि. 12: संत जनाबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, राणीचा बाग, पुणे या संस्थेला सर्व सोईसुविधायुक्त शासकीय, निमशासकीय, खासगी इमारत भाड्याने आवश्यक असून इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
या वसतिगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठा महाविद्यालय व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वर्गात शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींना मोफत प्रवेश दिला जातो. या संस्थेसाठी 5 हजार ते 5 हजार 500 चौ. फूट इतक्या क्षेत्रफळाची इमारत आवश्यक असून त्यामध्ये किमान 20 ते 25 खोल्या, 10 संडास, 10 बाथरुम, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सुविधा तसेच इमारतीभोवती संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे.
इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या पुणे शहराच्या जवळपासच्या भागातील इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, पुणे (दूरध्वनी 020-29706611) अथवा गृहपाल, संत जनाबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, 28 राणीचा बाग, पुणे-01 (भ्रमणध्वनी क्र. 7350525929) येथे संपर्क साधावा, असेही कळवण्यात आले आहे.