मुलांचं शिक्षण, रोजगार, एसटी कामगार यावर कोणी बोलतय का?
पुणे : नागरिकांच्या मुलभूत गरजा , जीवनावश्यक समस्या यावर न बोलता जातीत लोकाना अडकवून ,काही तरी वक्तव्ये करून लोकांची माथी भडकावून मते मिळवायचा धंदा करणारे सत्ताधारी आणि विरोधक आता दोघेही आपसात एकमेकांना संपवायला निघाले आहेत त्यानंतर उरणार कोण ? तर आपणच उरणार आहोत .. मनसैनिकांनी कोरोना काळात केलेल्या कामाची जाणीव आहे पडत्या काळात पक्षाबरोबर राहिलेल्यांची जाणीव आहे . २१ मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी करा आणि २ तारखेला पाडव्याला शिव्तीत्र्ठाव्र या पुण्यात तर छोटासा हा तीझार आहे शिव्तीत्र्हाव्र पिक्चर दिसेल असे येथे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते..दरवर्षी मुंबईत साजरा होणारा वर्धापन दिन सोहळा यंदा १५ वर्षानंतर प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढायचं ते जिंकण्यासाठीच या नव्या नाऱ्याने पक्ष महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. मुलांचं शिक्षण, रोजगार, एसटी कामगार असे अनेक प्रश्न राज्यात निर्माण झाले आहेत त्यावर कोणी बोलतय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला राज ठाकरे म्हणाले, राज्यातील नागरिक अनेक अडचणीत सापडले आहेत, ते मदत मागण्यासाठी सरकार कडे जात नाहीत. त्यांच्यासमोर मुलांचं शिक्षण, नोकरी याबरोबरच एसटी कामगारांचा मूळ प्रश्न आहे. त्याकडेही बघितले जात नाही. आमचे मनसे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना मदत करत आहेत. त्यांच्या समस्य सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सरकार याकडे दुर्लक्ष करू लागले आहे.
राज्यपाल -कुडमुड्या राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला. तुम्हाला शिवराय समजतात का? जर एखाद्या विषयातलं आपल्याला समजत नसेल तर त्यावर भाष्य कशाला करायचं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला.राज्यपालांवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. त्यात हे आपले राज्यपाल. एकदा मी त्यांना भेटायला गेलो तर वाटलं हे तर कुडमुडे ज्योतिषी आहेत की काय. त्यांनी शिवरायांबाबत एक विधान केलं. पण आपल्याला ज्या विषयातील माहिती नाही, त्या विषयावर बोलायचं कशाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण कधी रामदास स्वामींचे शिष्य असल्याचं सांगितलं नाही. ना रामदास स्वामींनी आपण शिवरायांचा गुरू असल्याचा दावा केलाय. पण रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढं चांगलं लिहिलंय, तेवढं कुणीही लिहिलेलं नाही. निश्चयाचा महामेरू… हे सुभाषित आज पुन्हा वाचा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्यावरूनही राज ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधला. इतक्या छोट्या वयात लग्न व्हायची, हे मला माहितच नव्हतं, असे राज्यपाल म्हणाले, पण त्याकाळात लहानपणी लग्न व्हायची. बालविवाह व्हायचे. पण तुमचे अजून झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.
प्रमुख मुद्दे :
🔸मध्यंतरीच्या काळात माझ्यावर संकटं आली. आपल्या पक्षावर आली. संकटं जेव्हा येतात, तेव्हा हातात हात घालून येतात आणि जातात तेव्हा एकएकटी जातात. अशा संकटांना घाबरून जायचं नसतं. त्यांना सामोरं जाऊन आपण पुढे जाणं महत्वाचं. या संकटकाळात तुम्ही- सर्व महाराष्ट्र सैनिक, तुमची कुटुंबं माझ्यासोबत राहिलात. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो.
🔸बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवलं गेलं. आम्हाला इतिहास नाही बघायचा, आम्हाला इतिहास लिहिणाऱ्याची जात बघायची आहे! महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना तुम्हाला जातीपातीत अडकवून ठेवायचं आहे.
🔸आपल्या राज्यपालांना काही समज वगैरे काही आहे की नाही? कुडमुडे ज्योतिषी असतात ना, तसे आहेत! शिवाजी महाराज, रामदास स्वामी यांच्याबद्दल यांना काही माहिती आहे का? यांना एकाचं (महाराजांचं) शौर्य कमी करायचं आहे आणि दुसऱ्याची (स्वामींची) विद्वत्ता कमी करायची आहे. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलं आहे तितकं सुंदर वर्णन मी कुठेही वाचलेलं नाही. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी जे लिहिलं आहे ते मी माझ्या घरात लावलं आहे…. “श्रीमंत योगी”! दुर्दैवाने, आमच्याकडे कुणी ‘योगी’ नाहीच! ईडीची धाड पडली की कळतं हा ‘श्रीमंत’ आहे!!
🔸राज्यपालांनी महात्मा फुले- सावित्रीबाई यांच्याबद्दल वक्तव्य केलं. अहो, तेव्हा लहानपणीच लग्नं व्हायची. तुमचं अजून नाही झालं! नको तिथे बोटं घालायची यांना सवय आहे.
🔸सध्याच्या वातावरणात निवडणूक नाही. निवडणूक पुढे ढकलायला ओबीसी समाजाची मोजणी वगैरे कारणं देताहेत. हे सगळं झूठ आहे. मला कुणाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा आजारपणाबद्दल बोलायचं नाही. पण, मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाही हे खरं कारण आहे.
🔸संजय राऊत किती बोलतात? कसले हातवारे करत बोलतात.. महिला, विद्यार्थी, नोकऱ्या किंवा एसटीच्या विषयावर कुणी बोलत नाही. राजकीय नेत्यांची भाषणं, त्यांचे वाद-विवाद तरुण पिढी बघत आहे.
🔸कसली संपर्क कार्यालयं? कार्यालय न उघडताही लोकांनी त्यांच्या कामांसाठी तुम्हाला संपर्क करायला हवा. लोक त्यांच्या कामांसाठी सरकारकडे जात नाहीत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या राज ठाकरेकडे येतात. नोकरी, ऍडमिशनचे प्रश्न घेऊन आपल्याकडे येतात. लोकांचा आपल्यावरचा हा विश्वास हीच आपल्या सर्वांची गेल्या १६ वर्षातील कमाई आहे. करोना लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सर्वांनी- महाराष्ट्र सैनिकांनी जे काम केलं, त्याबद्दल तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत.
🔸महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रासाठी काही तरी चांगलं काम करायची जी आग तुमच्यात आहे ना, ती कधीही विझू देऊ नका.
🔸गेल्या काही दिवसांत मी आपल्या काही पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन जेवलो. यापुढे कुठे गेलो तर तिथेही पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन जेवेन. पण इतर राजकीय नेत्यांप्रमाणे कुणाची जात बघून त्याच्या घरी जेवणार नाही!
🔸२१ मार्चला तिथीनुसार शिवजयंती आहे. हा आपल्याला आपली ओळख देणाऱ्या राजाचा जन्मदिवस आहे. आपला सण आहे. तो सर्वांनी धुमधडाक्यात साजरा करावा.
🔸आजचं माझं भाषण म्हणजे फक्त टिजर/ ट्रेलर आहे. संपूर्ण चित्रपट २ एप्रिल- गुढीपाडव्याला शिवतीर्थावर!
🔸२ एप्रिलला आपला गुढीपाडवा मेळावा आहे. त्यासाठी शिवतीर्थावर- छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येण्याचं आमंत्रण मी तुम्हा सर्वांना देतो.

