डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ – महापौर मुरलीधर मोहोळ

Date:

  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार
  • पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष

पुणे (प्रतिनिधी) : संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सन्मानपूर्वक दिला जाणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून यापूर्वी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना ‘अटल गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. 25 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून पुरस्काराचे वितरण राज्याचे विरोधीपक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असे आहे. कोथरूड मतदार संघाचे आमदार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
खासदार गिरीश बापट, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपा पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

‘पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संवाद पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर अटलजींच्या रचना सादर करणार असून अभिनेत्री भार्गवी चिरमुले नृत्य सादर करणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन सुनील महाजन यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार आहे,’ अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...