मुंबई-एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारी शरद पवार यांच्या बंगल्यावर अचानक हल्लाबोल केला. आंदोलक पळत आले व त्यांनी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले , 124 महिलांचे कुंकू पुसले गेले, त्या व्यथित दिसत आहेत, सुप्रिया सुळे म्हणत होत्या की, चर्चेने प्रश्न सोडवू पण सुप्रिया सुळेंनी कष्टकऱ्यांना चर्चेसाठी कधी बोलावले? पण त्या केवळ डायलॉग मारतात. एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केलाच नाही. हे आरोप चुकीचे आहेत कष्टकऱ्यांच्या संदर्भात बातमी कानावर आली तेव्हा मी न्यायालयात होतो. मला व्हिडिओ दाखविण्यात आला. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे म्हणतात की, चर्चा करू पण चर्चेला कधी बोलाविले हे आधी सुप्रिया सुळेंनी स्पष्ट करावे असेही ते म्हणाले.
124 महिलांचे कुंकु पुसले गेले पण सुप्रिया सुळे हल्ला झाला म्हणतात महिला हल्ला कशा करतील उलट त्या व्यथित होत्या. व्यथित झालेल्या महिला हल्ला कसा करतील असा सवाल करीत कुणीतरी एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाने हल्ला केला असेल तर याची मला खात्री नाही. एसटी कर्मचारी हल्लेखार असतील तर त्यांना चक्कर कशी येईल, हल्लेखोर असतील तर त्या बांगड्या कशाला दाखवतील असे म्हणत कुणावर जर हल्ला झाला असेल तर त्याचे आम्ही समर्थन करणार नाही असेही ते म्हणाले.काल या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर मी विपश्यना करा, मनस्थिती ढासळु देऊ नका असे एसटी कर्मचाऱ्यांना सांगितले होते. पोलिसांना कारवाया मागे घेण्याचे न्यायालयाने सांगितले पण राज्य सरकार आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची भाषा करते हे चुकीचे आहे.लक्षात ठेवा मी व्यक्तीगत आयुष्यात खोटे बोलत नाही. सकाळपासून माझ्या संपर्कात माध्यमांचे प्रतिनिधी होते. तुम्ही आंदोलनाला हल्ला म्हणता पण ते हल्लेखार नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे जीव गेलेल आहेत लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचे राजकारण करु नका, राजकारण चुलीत घाला असेही ते म्हणाले.

