मुंबई दि.५ जुलै : पुण्यामधील स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येला राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असून ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप करतानाच लोणकर कुटुंबियांना तात्काळ राज्य सरकारने ५० लाख रुपयांची मदत देण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होताच, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. आपला मुद्दा मांडतांना दरेकर यांनी सरकाराच्या बेफिकिरपणाचा पर्दाफाश केला. एमपीएससीची परीक्षा झाली नाही, ते त्यामध्ये उत्तीर्ण झाले, पण मुलाखत न घेतल्यामुळे, नोकरी मिळू शकली नाही. अखेर स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली. आम्ही या विषयावर कोणतेही राजकारण करित नाही. पण लोणकर यांची आई व बहिणीने स्वप्नीलच्या आत्महत्येवर आक्रोश केला आहे. त्याच्या आत्महत्येला सरकारला दोषी ठरविले आहे, असेही दरेकर यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले.
सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहेत, हे जाहीर करण्याची मागणी करतानाच दरेकर यांनी स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असं हे पत्र आहे. सरकारकडे विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकायला वेळ नाही. सरकार कधी जागे होणार? किती स्वप्निलच्या आत्महत्येची सरकार वाट बघत आहे? असा सवालही दरेकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केले.
मुख्य परिक्षा झाली नाही. यामुळे स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. घरची बेताची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. कोरोना नसता तर सगळं काही ठीक असतं व परिस्थिती वेगळी असती. माझ्याकडे वेळ नव्हता नकारात्मकची वादळ मनात घोंगावत होतं, परंतु काहीतरी चांगलं होईल परंतु आता खुश राहण्यासाठी काही उरलं नाही. मला माफ करा अशी भावना व्यक्त करतानाच त्यातून स्वप्नीलने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे दरकेर यांना सांगितले.
दीड वर्ष ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असुन मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना नेमले गेले नाही, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात कोणतेही ठोस पावले उचलली गेली नसुन ठाकरे सरकार या बाबत अपयशी ठरले आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.
ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

